सोलापूरच्या इस्लामपूर जिल्हा परिषद शाळेचं रुप पालटलं; श्रमदानातून शिक्षकांनी व ग्रामस्थांनी करुन दाखवलं

देशमुख वस्ती वरील शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शाळेची दुरावस्था फारच बिकट झाली होती. त्यातच जिल्हा परिषदेकडून शाळेच्या नूतनीकरणाचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातच गावातील ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन लोकवर्गणी दिली.

सोलापूरच्या इस्लामपूर जिल्हा परिषद शाळेचं रुप पालटलं; श्रमदानातून शिक्षकांनी व ग्रामस्थांनी करुन दाखवलं
इस्लामपूर जिल्हा परिषद शाळा

सोलापूर: कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. कोरोना महामारीमुळं अनेकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. संकटाच्या या काळातही अनेकांनी सकारात्मक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवले. महामारीमुळं निर्माण झालेल्या नैराश्यावर मात करत विधायक कामं उभी करण्यात आल्याची अनेक उदाहरणं आपल्याला सभोवताली पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील गावकऱ्यांनी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि सहशिक्षकांनी शाळेचं चित्र पालटून टाकलं आहे. माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावातील जिल्हा परिषद शाळेचं पालटलेलं चित्र सर्वांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी ठरतेय.

गेल्या दीड वर्षापासून कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या आहेत. गेल्या दीड वर्षात अनेक शाळांची दुरावस्था झाली आहे. शाळा बंद होत्या त्या काळात माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर जिल्हा परिषद शाळेचे श्रमदानातून शिक्षकांनी व ग्रामस्थांनी शाळेचे रुपडे पालटले आहे. त्यामुळे शाळेला नाविन्यपूर्ण रूप प्राप्त झाले आहे. इस्लामपूर गावातील जिल्हा परिषद शाळेला आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.

लोकसहभागातून शाळेचं चित्र पालटलं

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम इस्लामपूर येथील देशमुख वस्ती शाळेत राबवण्यात आला.त्यासंदर्भात लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सहयोगी शिक्षकांकडून वर्गणीतून शाळेची रंग रंगोटी तसेच शाळेतील विविध भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटण्यात आली असून सर्व भिंती बोलक्या करण्यात आलेल्या आहेत.त्याचबरोबर शौचालय, पिण्याची पाण्याची टाकी,परसबाग, पार्किंग तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी लागणारे साहित्य याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसत आहेत. आता फक्त शाळेतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे मुख्याध्यापक धनाजी जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना उत्सुकता

कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून घरी बसून कंटाळा आला आहे. मात्र शाळेचे रूप पाहून शाळेबद्दल अजूनही उत्सुकता निर्माण झाल्याची विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते. स्वप्नील जाधव या विद्यार्थ्यानं शाळा लवकर सुरु व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. गेल्या दीड वर्षापासून शाळेपासून लांब राहिलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा शाळा सुरु होतील त्यावेळी आपल्या शाळेचं, वर्गाचं रुप बदलेलं पाहायला मिळणार आहे.

ग्रामस्थांचा पुढाकार लोकवर्गणीतून रुपडं पालटलं

देशमुख वस्ती वरील शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शाळेची दुरावस्था फारच बिकट झाली होती. त्यातच जिल्हा परिषदेकडून शाळेच्या नूतनीकरणाचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातच गावातील ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन लोकवर्गणी दिली. आज देशमुख वस्ती शाळेची रुपडे वाखाणण्याजोगे झाले आहे.लोकसहभागातून एखाद्या चांगल्या कृती मार्गी लागण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशमुख वस्ती वरील शाळेचे बदललेले रूप आहे आता या नाविन्यपूर्ण वर्गांना शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे, असं ग्रामस्थ नानासाहेब जाधव जाधव म्हणाले.

इतर बातम्या:

लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’

Solapur Malshiras Islampur ZP School developed by teachers and villagers

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI