AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INI CET 2021 Exam Postponed: सुप्रीम कोर्टाचा आयुर्विज्ञान संस्थांमधील INI CET परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्यावतीनं 16 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली INI CET परीक्षा 2021 लांबणीवर टाकण्यात आली आहे. INI CET 2021 Exam Postponed

INI CET 2021 Exam Postponed: सुप्रीम कोर्टाचा आयुर्विज्ञान संस्थांमधील INI CET परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय
सुप्रीम कोर्ट
| Updated on: Jun 11, 2021 | 6:30 PM
Share

INI CET 2021 Exam Postponed नवी दिल्ली: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्यावतीनं 16 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली INI CET परीक्षा 2021 लांबणीवर टाकण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं परीक्षा 1 महिना लांबणीवर टाकण्याचा आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान परीक्षेसंदर्भात नोटिफेकशन जारी करणार आहे. वकील पल्लवी प्रताप यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका आश्वासनाचा उल्लेख करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल मे च्या दरम्यान पुढील चार महिने परीक्षा घेण्यात येणार नाहीत, असं जाहीर केलं होतं. एम्सच्या परीक्षा आयोजित करणं त्या आश्वासनाचा अपमान असल्याचा दावा करण्यात आला होता. (Supreme Court ordered postpone INI CET 2021  exam for one month )

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपोर्टेस कंबाईन्ड प्रवेश परीक्षेची प्रवेशपत्रं बुधवार 9 जून रोजी जारी केली होती. तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा स्थगित करावी यासाठी आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांनी ट्विटरवर मोहिम राबवली होती.

12-12 तास कोरोना संकटात काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोना संकटात पुढं येऊन मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी पुढील 4 महिने परीक्षा होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. MBBSचे विद्यार्थी कोविड ड्युटीमध्ये काम करत आहेत. तेच विद्यार्थी परीक्षांना सामोरं जाणारं होते. विद्यार्थ्यांनी 12-12 तास कोरोना ड्युटी केल्यानंतर परीक्षांची तयारी कशी करावी, असा सवाल केला होता. तर, विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तयारी नसल्याचं म्हटलं आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपोर्टेस कंबाईन्ड प्रवेश परीक्षा(INI CET 2021) मास्टर्स ऑफ सर्जरी (एमएस), डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी), मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (एमएसडीएस), डॉक्टरेट ऑफ मेडिसिन (डीएम), आणि मास्टर ऑफ चिरुर्गी (एमसीएच) यासारख्या पदव्युत्तर कोर्समधील प्रवेशासाठी घेतली जाते. हा कोर्स दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, ऋषिकेश, रायपुर, जोधपुर, NIMHANS बेंगलुरु, JIPMER पुदुचेरी आणि पीजीआई चंडीगढ़ सह आठ एम्स मध्ये घेतली जाते.

संबंधित बातम्या

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्यापासून अनलॉकची शक्यता, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.