AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत.

इच्छित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना करावी लागणार तारेवरची कसरत, निकालाच्या टक्क्यात वाढ!
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
| Updated on: Jun 09, 2022 | 8:52 AM
Share

मुंबई : यंदा बारावीचा निकाल चांगला लागला आहे. संपूर्ण राज्यामधील (State) निकालाचा टक्का देखील वाढलाय. यामुळे पदवी प्रवेशात कटऑफमध्ये देखील वाढ होणार हे नक्की. राज्य शिक्षण मंडळाचा निकाल जाहिर झालाय. मात्र, आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डचा निकाल अद्याप लागला नसल्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना (Student) थोडी वाट बघावी लागणार. मेडिकल आणि इंजिनीयरिंग प्रवेशासाठी परीक्षा देखील ऑगस्टमध्ये होणार आहे. यामुळे यंदाही महाविद्यालयांची (College) प्रवेश प्रक्रिया थोडी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्वतली जातेय. विशेष : सायन्स आणि कॉमर्स शाखेच्या टक्क्यामध्ये मोठी वाढ झाल्याने प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्की आहे.

2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी झाले पास

यंदाच्या बारावीच्या निकालामध्ये राज्यातील 2 लाख 94 हजार 164 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची पास होण्याच्या संख्येमध्ये वाढ झालीये. मात्र, गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे देखील पाहिला मिळते आहे. यामुळे आवडत्या काॅलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार. फक्त एका मुंबई विभागातून 93 हजार 616 विद्यार्थी सायन्स शाखेतून पास झाले आहेत. तर 1 लाख 55 हजार 911 विद्यार्थी हे कॉमर्स शाखेमधून पास झाले आहेत. कोरोनामध्ये काॅलेजला न जाता विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.

राज्यात झाल्या आॅफलाईन परीक्षा

जे विद्यार्थी सीईटीची तयारी करत आहेत, ते लगेचच पदवीसाठी प्रवेश घेण्याची घाई करत नाहीत. जर सीईटीमध्ये मार्क्स कमी आले तर मग व्यावसायिक अभ्यासक्रम, एमसीए, फार्मसी, बीएसी असे पर्याय शोधतात. दोन वर्षांमध्ये कोरोना असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला होता. कोरोनामध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना काॅलेज किंवा शिकवणीसाठी घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. आॅनलाईन पध्दतीनेच शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी आॅफलाईन परीक्षा दिल्या. शिक्षण आॅनलाईन झाले आहे तर परीक्षा देखील आॅनलाईनच घ्याव्यात. अशी मागणी काही दिवसांपूर्वी जोर धरू लागली. मात्र, राज्यातील परीक्षा या आॅफलाईनच घेण्यात आल्या.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान