NEET UG Result 2023 : पैसे वाचवण्यासाठी ती मैलोन् मैल चालत जायची… ट्रक मेकॅनिकच्या मुलीचा यशस्वी प्रवास वाचलात का ?
एका ट्रक मेकॅनिकच्या मुलीने NEET UG परीक्षा उत्तीर्ण केली आहे. झोप येऊ नये म्हणून ती पंखा न लावता अभ्यास करत असे.

NEET UG Result 2023 : प्रयत्ने वाळूचा कण रगडिता तेलही गळे… ही म्हण तर सर्वांनाचा माहीत असेल. अथक मेहनत घ्यायची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. हीच म्हण एका ट्रक मेकॅनिकच्या मुलीने खरी करून दाखवली आहे. तिथे अथक परिश्रम करत, घाम गाळत NEET UG परीक्षा पास (success story) केली . एवढेच नव्हे तर त्यात तिचा 192 वा क्रमांक आला आहे.
NEET UG 2023 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी सुमारे 20 लाख उमेदवार बसले होते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरातील 4,000 हून अधिक नियुक्त केंद्रांवर घेण्यात आली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ट्रक मेकॅनिकची मुलगी आरती झा हिने NEET UG मध्ये 192 वा क्रमांक मिळवला आहे. ती 2020 पासून NEET ची तयारी करत होती.
आपल्या यशाचे श्रेय तिने तिचे कुटुंबिय आणि शिक्षकांना दिले. आरतीने सांगितले की तिने 2018 मध्ये एसएस पब्लिक स्कूलमधून 12वी बोर्डाची परीक्षा 86 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आणि 2020 मध्ये NEET ची तयारी सुरू केली. आता मी एमबीबीएसवर लक्ष केंद्रित करणार आहे. मला कोणत्या विषयात मेजर करायचे आहे हे मी अजून ठरवलेले नाही, असेही आरती म्हणाली.
ट्यूशन घेऊन करायची कमाई
आरतीने आत्तापर्यंत अथक मेहनत केली आहे. ती तयारीसाठी घरापासून 17 किमी दूर कोचिंग क्लासला जात असे आणि 10 रुपये वाचवण्यासाठी दररोज तीन किमी चालत असे. यासोबतच मुलांना ट्युशनही शिकवत असल्याचे तिने सांगितले.
आरतीचे वडील विश्वंभर झा हे ट्रक मेकॅनिक आहेत. माझ्या मुलीने तिचे ध्येय गाठले आणि माझे स्वप्न पूर्ण केले, मला तिचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. झा हे महिन्याला सुमारे 20,000-25,000 रुपये कमावतात. मुलांच्या शिक्षणासाठी ते बराच खर्च करतात.
आरती तिचे आई-वडील आणि तीन भावंडांसोबत आग्रा येथील सेवला भागात राहते. चा
