Maharashtra Board SSC Result 2025 : किती मुलांना 100 टक्के? किती शाळांचा निकाल 0 टक्के? 10 वी च्या निकालाची 10 वैशिष्टय
Maharashtra Board SSC Result 2025 : महाराष्ट्रात आज 10 वी चा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाची 10 वैशिष्टय 10 पॉइंटमध्ये समजून घ्या. कुठला विभाग अव्वल, मुलं कि मुली सरस? किती मुलांना 35 टक्के, किती मुलांना 100 टक्के जाणून घ्या.

यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालाबद्दल माहिती दिली आहे. या निकालाची काही ठळक वैशिष्ट्य आहेत ती जाणून घ्या.
यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान झाली. १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदा उर्तीण होणाऱ्या विद्यार्थ्यांच प्रमाण ९४.१० टक्के आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत मुलीच हुशार ठरल्या आहेत. ९६.१४ टक्क्यासह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षा ६२ विषयांसाठी घेतली होती. त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७५ टक्के पेक्षा अधिक गुण पडलेले हे विद्यार्थी आहेत.
४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. म्हणजे ६० किंवा त्याहून अधिक टक्केवारी असलेले. पण ७५ टक्क्यांपेक्षा कमी विद्यार्थी. ३ लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. ४५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आणि ६० टक्के पेक्षा कमी मार्क घेतलेले विद्यार्थी. १ लाख ८ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना ३५ टक्क्याहून अधिक ते ४५ टक्क्यांपेक्षा कमी मार्कस मिळाले.
एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले. कुठल्या विभागात असे किती विद्यार्थी आहेत ते जाणून घ्या. पुणे ५९, नागपूर ६३, संभाजी नगर २८, मुंबई ६७, कोल्हापूर १३, अमरावती २८, नाशिक ९, लातूर १८.
महाराष्ट्रात इयत्ता दहावीत शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा 49 आहेत. कुठल्या विभागात अशा किती शाळा आहेत ते जाणून घ्या. पुणे ७, नागपूर ८, संभाजीनगर ९, मुंबई ५, कोल्हापूर १, अमरावती ४, नाशिक ४, लातूर १०, कोकण १, या शाळांचा निकाल शून्य टक्के लागला.
७ हजार ९२४ शाळांचा निकाल 100 टक्के लागला. ३३. ७३ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के. पुणे १ हजार ३११, नागपूर ७३६, संभाजीनगर ६८७, मुंबई १५७९, कोल्हापूर १११४, अमरावती ७८९, नाशिक ७७६, लातूर ४४६, कोकण ४८६,
१०० टक्के मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यात १३, नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूर ११३, कोकणात ९ विद्यार्थी आहेत.
उद्यापासून १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. मंडळाकडे अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करता येईल. फि भरावी लागते. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार आहे.
जिल्हानिहाय सर्वाधिक निकाल. सिंधुदुर्ग ९९.३२ टक्के. जिल्हानिहाय सर्वात कमी निकाल. गडचिरोली ८३.६७ टक्के. सर्व विभागात कोकण विभागाने बाजी मारली आहे. ९८.२८ टक्के निकाल. सर्वात कमी निकाल नागपूर ९०.७८ टक्के.