UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द

देशभरात सगळीकडे दहावी आणि बारावीच्या (Class 12) परीक्षा सुरु आहेत. अनेक ठिकाणी परीक्षांमध्ये गैर प्रकार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात असाच एक प्रकार समोर आला आहे.

UP Board 2022 : उत्तर प्रदेशात बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, 500 रुपयांना विक्री, 24 जिल्ह्यात परीक्षा रद्द
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:43 PM

लखनौ : देशभरात सगळीकडे दहावी आणि बारावीच्या (Class 12) परीक्षा सुरु आहेत. अनेक ठिकाणी परीक्षांमध्ये गैर प्रकार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात असाच एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश बोर्डाचा (UP Board) बारावीचा पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. बारावीचा इंग्रजी विषयाचा (English Paper leak) पेपर फुटल्यानंतर तो 500 रुपयांना विकण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. उत्तर प्रदेश बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर याची माहिती शिक्षणमंत्री गुलाबो देवी यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार 24 जिल्ह्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आग्रा, मैनपुरी, मथुरा, गाझियाबाद, अलीगढ, बागपत जिल्ह्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आह. यानंतर या प्रकरणाची चौकशी एसटीएफला देण्यात आली आहे. तर दोषींवर रासुका लावण्यात येणार आहे.

24 जिल्ह्यात पेपर फुटला

उत्तर प्रदेशातील बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेपैकी इंग्रजी विषयाचा पेपर लीक झाला. 24 जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची शक्यता असल्यानं तिथला इंग्रजीचा पेपर रद्द करण्यात आला आहे. परीक्षेपूर्वी बारावीचा इंग्रजीचा पेपर 500 रुपयांना विकला जात असल्याच समोर आलं आहे. आग्रा, मैनपुरी, मथुरा, अलीगढ, गाझियाबाद, बागपत, बदायूँ, शाहजहांपूर, उन्नाव, सीतापूर, ललितपूर, महोबा, जालौन, चित्रकूट, आंबेडकरनगर, प्रतापगड, गोंडा, गोरखपुरी, आझमगढ, बलिया, वाराणसी, कानपूर, देहात एटा आणि शामली जिल्ह्यातील परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल

उत्तर प्रदेशच्या बोर्ड परीक्षा सध्या सुरु आहेत. बारावीच्या परीक्षा सुरु असून इंग्रजीचा पेपर लीक झाला आहे. या पेपरची 500 रुपयांना विक्री होत असल्याचं देखील समोर आलं होतं. हा पेपर सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेशच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. यानंतर यूपी सरकारनं तडकाफडकी 24 जिल्ह्यातील परीक्षा रद्द करण्यात आली. दोषींवर रासुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

Mango Damage अवकाळीचं संकट वर्षभर राहिलं, यंदा आंबा फळपिकाचेही गणित बिघडलं

Ahmednagar | जमिनीला भेगा पडल्यानं एकच घबराट! भूगर्भातील हालचालींमुळे बोरबन गावातील जमिनीला भेगा?

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.