AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC Exam : दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास मान्यता रद्द करु, वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) सध्या सुरु असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या शाळा गैर प्रकार करतील त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येतील असा इशारा दिला आहे.

SSC Exam : दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास मान्यता रद्द करु, वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा
वर्षा गायकवाडImage Credit source: Maharashtra MLS
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 8:40 PM
Share

मुंबई: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) सध्या सुरु असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या शाळा गैर प्रकार करतील त्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येतील असा इशारा दिला आहे. विधानपरिषदेत वर्षा गायकवाड यांनी भाजप (BJP) आमदार निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात उत्तर दिलं आहे. काल दि.15 मार्च रोजी दहावीच्या (SSC exam) मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.

टविट

सर्वांनी सहकार्य करावं

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे,यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे,लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे.

पाहा व्हिडीओ

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 1 तास अगोदर पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांची जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात घेतलं जाणार नाही. परीक्षेचं टायमिंग 10.30 आहे तर 9.30 पर्यंत केंद्रावर पोहोचायला हवं. तर, दुपारी 3 वाजता पेपर आहे तर दुपारी 2 वाजता केंद्रावर यायला हवं. या परीक्षांच्या निमित्तानं केंद्रामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आम्ही गृहविभागाकडे अधिकचा बंदोबस्त मागितला आहे.

माझी समाजमाध्यम आणि लोकप्रतिनिधींनी खात्री करुन बोललं पाहिजे अशी विनंती आहे. आम्ही आता हेल्पलाईन क्रमांक जारी करत आहोत. त्यांच्याशी बोलून सर्वांनी माहिती घ्यावी, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

इतर बातम्या :

जेव्हा व्यंकय्या नायडूंनी मराठी भाषेतून रजनी पाटलांचं कौतुक केलं! म्हणाले, ‘तुम्ही खूप चांगलं…’

अजितदादांकडून आमदारांना होळीचं गिफ्ट! विकास निधीत 1 कोटींची वाढ, PA आणि Driver चा पगारही वाढवला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.