मुंबईः आपले उत्पादन अथवा सुविधांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, या प्रक्रियेस मार्केटिंग (Marketing) म्हटले जाते. कोणत्याही ब्रँडसाठी त्यांची क्वॉलिटी जितकी महत्वाची आहे, तितकेच त्याचे मार्केटिंगही महत्वाचे ठरते. तुमचा व्यवसाय नवा असो वा जुना, मोठा असो किंवा लहान, मार्केटिंग महत्वपूर्ण ठरते. आजच्या आधुनिक काळात मार्केटिंगच्या पद्धतीतही बदल झाला आहे. यापूर्वी पारंपारिक पद्धतीने एखाद्या ब्रँडचे मार्केटिंग केले जायचे मात्र आता ती जागा डिजिटल मार्केटिंगने (Digital Marketing) घेण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही पद्धतींमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे ग्राफिक्स डिझाइन(Graphic Design). तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तर लगेचच सफलता डॉट कॉमद्वारे चालवण्यात येणाऱ्या Advance Graphic Designing Course साठी प्रवेश घेऊ शकता. या कोर्ससाठी (Course)प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना दोन महिन्यात डिझाइनिंगशी निगडीत सर्व टूल्सची पूर्ण माहिती शिकवली जाते. त्याशिवाय या विशेष कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्यांकडून प्रॅक्टिकलही करून घेतले जाईल.