AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ मुस्लिम तरुणाने मोदींच्या कानात काय सांगितलं?; ओवेसी म्हणाले…

टोपी घातलेला एक मुस्लिम तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काही तरी सांगत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. (Asaduddin Owaisi Comment On Pm Modi On Viral Photo With Muslim Man In Bengal)

'त्या' मुस्लिम तरुणाने मोदींच्या कानात काय सांगितलं?; ओवेसी म्हणाले...
narendra modi
| Updated on: Apr 09, 2021 | 2:40 PM
Share

कोलकाता: टोपी घातलेला एक मुस्लिम तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काही तरी सांगत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. ऐन पश्चिम बंगाल निवडणुकीच्या रणधुमाळीतच हा फोटो व्हायरल झाल्याने त्यावरून टीका होत आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. (Asaduddin Owaisi Comment On Pm Modi On Viral Photo With Muslim Man In Bengal)

असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून ही टीका केली आहे. एक मुस्लिम तरुण मोदींच्या कानात काही तरी सांगत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मोदीजी, मी बांगलादेशी नाही, असं या तरुणाने मोदींच्या कानात सांगितल्याचा चिमटा ओवेसी यांनी काढला आहे. ओवेसी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मोदींवर आणखी टीका केली आहे. हा तरुण मोदींना म्हणतो सीएए आणि एनआरसीबाबत आम्ही कागदपत्रे दाखवणार नाही. मोदीजी, माझ्यासारखी टोपी तुम्ही कधी डोक्यावर घालणार आहात? मोदीजी मी डोक्यावर टोपी घातली आहे, पण तुम्ही तर देशालाच टोपी लावली आहे, अशी टीकाही ओवेसी यांनी केली आहे. मोदीजी तुम्ही तीन तलाकच्या कायद्याला मानत नाही, असंही या तरुणाने मोदींना त्यांच्या कानात सांगितलं असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

नेमकं काय घडलं?

3 एप्रिल रोजी मोदी पश्चिम बंगालच्या सोनारपूर येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. या रॅलीत ते जुल्फिकार नावाच्या या तरुणाला भेटले. यावेळी मोदींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि काहीवेळ त्याच्याशी चर्चाही केली. मोदी गेल्यानंतर जेव्हा जुल्फिका यांना मोदींनी तुमच्याशी काय चर्चा केली असं विचारण्यात आलं, तेव्हा मोदींनी मला माझं नाव विचारलं आणि काय बनण्याची तुझी इच्छा आहे, असं विचारलं, असं जुल्फिकारने सांगितलं.

खासदार, आमदार व्हायचं नाही

मोदी त्यांच्या गाडीच्या दिशेने जात होते. तेव्हा उपस्थित लोकांनी मोदींना नमस्कार केला. मीही मोदींना सलाम केला. तेव्हा मोदींनीही मला सलाम केला. त्यानंतर ते गाडीतून उतरले आणि मला माझं नाव विचारलं. तेव्हा मी त्यांना माझं नाव जुल्फिकार अली असल्याचं सांगितलं. तेवढ्यात हेलिकॉप्टरचा आवाज सुरू झाल्यानं ते ऐकू शकले नाही. त्यामुळे ते माझ्या जवळ आले तेव्हा मी त्यांना पुन्हा माझं नाव सांगितलं. तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून भविष्यात काय होण्याची इच्छा आहे, असं ते म्हणाले. त्यावर मला खासदार किंवा आमदार व्हायचं नाही, तर मला देशासाठी काही तरी करायचं आहे, असं मी त्यांना सांगितलं. (Asaduddin Owaisi Comment On Pm Modi On Viral Photo With Muslim Man In Bengal)

संबंधित बातम्या:

West Bengal Election: हिंदूंनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाची नोटीस आली असती; मोदींची टीका

West Bengal Election: ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौल

भाजपच्या विरोधात एकत्र या, ममता बॅनर्जी यांचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं

(Asaduddin Owaisi Comment On Pm Modi On Viral Photo With Muslim Man In Bengal)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.