Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Result 2025 : आपचा नाही भाजपचा ‘आपला’ मुख्यमंत्री? सत्ता स्थापनेसाठी AAP-Congress ची होणार आघाडी?

Delhi Election Result 2025 : भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?

Delhi Election Result 2025 : आपचा नाही भाजपचा 'आपला' मुख्यमंत्री? सत्ता स्थापनेसाठी AAP-Congress ची होणार आघाडी?
दिल्ली निकालातून काँग्रेस धडा घेणार? धडा शिकवणार?
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 9:16 AM

देशाच्या राजधानीत भाजपाचे कमळ फुलत असल्याचे सुरुवातीच्या कलामध्ये समोर येत आहे. येणारे कौल हे आपसाठी धक्कादायक आहेत. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने आहेत. आता काँग्रेस, आप चूक सुधारतील का?

कलांनी AAP ची उडवली झोप

दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. दिल्लीकरांनी आपला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे दिसून येते. अर्थात आप अजूनही मैदानात आहे. तरीही भाजपाने मारलेली मुसंडी, ही सत्तेचा वनवास संपणारी दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

कलामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

कलानुसार, दिल्लीत कमळ फुलणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या साईटनुसार, 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यामध्ये भाजप 42 जागांवर तर आप 27 जागांवर तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्वात वाईट प्रदर्शन म्हणजे केवळ एका जागेवर काँग्रेस दिसत आहे. दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत आपकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपचे प्रमुख तीन नेत्यांमध्ये मनिष सिसोदीया हे आघाडीवर तर आतिषी आणि अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर दिसत आहेत.

काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर

एक तासानंतरच्या कलानुसार, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अजून चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आप सुद्धा अजून मैदानात तग धरून आहे. अरविंद केजरीवाल 1500 मतांनी तर मुख्यमंत्री आतिषी या 673 मतांनी पिछाडीवर आहेत. मनिष सिसोदिया हे आघाडीवर आहेत. भाजपाचे आकडे वाढत असताना, आपचे आकडे संथावले आहेत. गेल्या 12 वर्षांच्या केजरीवाल यांच्या सत्तेला भाजप सुरूंग लावण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे.

आप-काँग्रेस एकत्र येणार?

भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी मुसंडी मारली आहे. निकालानंतर जर-तरची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच काँग्रेसच्या पारड्यात अजून काही जागा मिळाल्या आणि सत्ता स्थापनेसाठी आपला काँग्रेसची गरज पडली तर हे दोन पक्ष एकत्र येतील का? याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष आघाडी करतील, एकत्र निवडणूक लढवतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. आता जर -तरची परिस्थिती उद्भवल्यास दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आघाडी करतील का? याचे उत्तर हे निकालच देतील.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.