AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिकाऱ्याला म्हणाले लाडूचा डबाही उघड; अजितदादांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडली चकली, चिवडा अन् गुलाबी जॅकेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली आहे. अजितदादांच्या बॅगेत बऱ्याच गोष्टी सापडल्या ज्यामुळे नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

अधिकाऱ्याला म्हणाले लाडूचा डबाही उघड; अजितदादांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडली चकली, चिवडा अन् गुलाबी जॅकेट
Ajit Pawar Helicopter Check
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 13, 2024 | 7:10 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणूक आयोगाकडून कसून तपासणी सुरु आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या बँगांची तपासणी झाल्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगेची तपासणी

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्याच्या राज्यभर सभा होत आहेत. यात दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दोन वेळा तपासणी झाल्यानंतर आता अन्य राजकीय नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी केली जात आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगेची तपासणी करण्यात आली.

याची माहिती स्वत: अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगेची तपासणी सुरु असताना बऱ्याच गोष्टी सापडल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. या गोष्टींमध्ये चकल्यांची पाकीटं,घरच्या लाडूचा डबा, थंड पाण्याच्या बॉटलचा एक बॉक्स, शिवाय दादांचे सगळ्यात आवडते गुलाबी जॅकेट, चिवड्याचे पाकीट अशा वस्तू सापडल्या आहेत.

अजित पवार अधिकाऱ्याला म्हणाले,”नीट तपास”

दरम्यान अधिकारी जेव्हा बॅग तपासत होते तेव्हा अजित पवार फोन वर बोलताना दिसत आहेत. मात्र फोनवर बोलता बोलत ते स्वत: अधिकाऱ्याला बॅगा तपासण्यासाठी देत असल्याचे दिसून येते. यावेळी एका बॅगेतून चकल्या निघाल्या,तर एका बॅगेत एक डबा होता.

अधिकाऱ्यानो तो डबा हातात घेऊन तसाच ठेवून देत असताना अजित पवारांनी त्याला तो डबा उघडण्यास सांगितल्याचेही दिसून आले. त्या डब्यात लाडू होते. तसेच अजित पवारांनी एक लाल रंगाचा छोटा बॉक्सही स्वत: उघडून दाखवला त्यात थंड पाण्याच्या बाटल्या असल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये सापडलेल्या गोष्टींनी मात्र लक्ष वेधून घेतलं होतं.

हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर

अजित पवारांनी आपल्या एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अजित पवारांनी लिहिलं आहे की,” मी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या हेलिकॉप्टरची आणि हेलिकॉप्टरमधील बँगांची तपासणी केली. मी यावेळी त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीसाठी अशाप्रकारच्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या असल्याचं माझं मत आहे. आपण सर्वांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची जोपासणा केली पाहिजे” असं लिहीत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक