Goa Election: भाजपने उत्पल पर्रिकरांचा पत्ता कापला, उत्पल यांनी तीन वाक्यात भाजपला फटकारलं; नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jan 20, 2022 | 1:49 PM

भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे.

Goa Election: भाजपने उत्पल पर्रिकरांचा पत्ता कापला, उत्पल यांनी तीन वाक्यात भाजपला फटकारलं; नेमकं काय म्हणाले?
utpal parrikar
Follow us on

पणजी: भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असं उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. अवघ्या तीन ओळीतच आपली भूमिका मांडत मी पणजीवरच ठाम आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपची ऑफर काय?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात निवडणूक लढणार असल्याचं उघड स्पष्ट झाल्यानंतर फडणवीसांना उत्पल यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी खुलासा केला. , पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आलं आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असं सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात

या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी गोव्यातील सर्व विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. गोव्यात आप आली आहे. आप केवळ सकाळापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहे. लोक या पक्षांना नाकारत आहे. दिल्लीत परिस्थिती काय आहे हे लोकांनी पाहिलं आहे. जगमगाती बिजली का नारा असं केजरीवाल म्हणाले होते. पण वीज मिळाली नाही. इथे वारंवार बत्तीगुल होत आहे. गोव्यात आपने अनेक आश्वासन दिले. लोकांना त्यांचं सत्य माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसला गोव्याचं काही पडलं नाही. केवळ लूटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवा आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासहार्यता संपली आहे, अशी टीका त्यांनी केली.

टीएमसी गोव्यात सुटकेस घेऊन आलीय

टीएमसी गोव्यात सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवश्यावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने दाखवली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही. पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही सुटेबल पार्टी वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत, असा दावा त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

आम्ही ‘सोंगाड्या’ नक्कीच नाही, चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाहीत, संजय राऊतांना फडणवीस, चंद्रकांतदादांवर निशाणा

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल