AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Election Final Result 2024: बारामतीचा गड शरद पवार यांनीच राखला, सुप्रिया सुळे विजयी

Baramati Lok Sabha Election Final Result 2024:: बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा देशाचे लक्ष होते. आतापर्यंत पवार कुटुंबियांचे वर्चस्व या मतदार संघावर राहिले. 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली.

Baramati Election Final Result 2024:  बारामतीचा गड शरद पवार यांनीच राखला, सुप्रिया सुळे विजयी
supriya sule and sunetra pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 04, 2024 | 3:56 PM
Share

पुणे जिल्ह्यातील नवीन तर देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात दुरंगी लढत झाली. पवार कुटुंबातील ही लढत चुरशीची झाली नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे एक लाखावरुन अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष केवळ एका जागेवरच विजय मिळणार आहे.

सकाळी सुनेत्रा पवार यांनी घेतली होती आघाडी

सकाळी ९ वाजता सुनेत्रा पवार दहा हजार मतांनी आघाडीवर गेल्या आहेत. बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणीस सुरुवात झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. त्या सकाळी १०.३० पर्यंत १९ हजार मतांनी पुढे होत्या. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.

बारामतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष

पवार कुटुंबामध्ये झालेल्या या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे (supriya sule maha vikas aghadi) तर महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Mahayuti) निवडणूक रिंगणात होत्या. नणंद-भावजय यांच्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. बारामती लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान झाले होते. बारामतीमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Baramati Lok Sabha Seat Winner History)

बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा देशाचे लक्ष होते. आतापर्यंत पवार कुटुंबियांचे वर्चस्व या मतदार संघावर राहिले. 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, त्यांची कन्या सुप्रिया सुळे 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झाले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर 21,14,716 मतदार होते. 1957 मध्ये येथे पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. 1960 च्या पोटनिवडणुकीत आणि 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार म्हणून निवडून आले. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर.के.खाडीलकर तर 1977 मध्ये जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले. 1980 मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि शंकरराव बाजीराव पाटील खासदार झाले.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.