AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने कॉंग्रेस पक्ष कार्यालयात तूफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल, कुठे घडली घटना पाहा

भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे 20 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने कॉंग्रेस पक्ष कार्यालयात तूफान हाणामारी, 20 जणांवर गुन्हा दाखल, कुठे घडली घटना पाहा
congressImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 08, 2024 | 10:12 PM
Share

लोकसभा 2024 चे निकाल लागले आहेत. भाजपाप्रणित आघाडी एनडीएचे सरकार उद्या शपथविधी घेत आहे. या निवडणूकांत अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. भाजपाच्या 15 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर उत्तर प्रदेशातील काही राज्यात तर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्रात देखील काही मंत्री पराभूत झाले आहेत. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती पक्षश्रेष्टींना केली होती. आपण पक्ष कार्याला वाहून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कॉंग्रेसमध्येही देखील पराभवाचे आणि अपेक्षित यश न मिळाल्याचे आफ्टर शॉक्स जाणवत आहेत.

केरळातील त्रिशूर लोकसभा मतदार संघात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. येथे कॉंग्रेस नेते मुरलीधन यांच्या पराभवाने कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यालयात महाभारत घडले आहे. आणि पक्ष सहकाऱ्यांतच मोठी हाणामारी झाली. पोलिसांनी शनिवारी त्रिशूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या ( डीसीसी ) चे सचिव सजवीन कुरियाचिरा यांच्या तक्रारीवरुन जोस वल्लूर आणि पक्षाच्या 19 अन्य सदस्यांविरोधात प्राथमिक फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, दुखापत करणे, आदी भादंवि कलमांर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

काय झाले नेमके ?

कुरियाचिरा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की शुक्रवारी डीसीसी अध्यक्ष वल्लूर आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे. कुरियाचिरा यांनी त्रिशुर लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस उमेदवाराच्या पराभवासाठी माजी खासदार टी.एन. प्रतापन आणि वल्लूर यांना जबाबदार ठरविले. मुरलीधरन यांच्या पराभवाने कॉंग्रेसच्या जिल्हा कमिटीत वाद निर्माण झाला आहे. बुधवारी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयाहबाहेर पोस्टर चिकटविण्यात आले होते. या पोस्टरवर कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या लाजीरवाण्या पराभवाबद्दल जिल्हा नेतृत्वावर टिका करण्यात आली होती. भाजपा नेते सुरेश गोपी यांनी मुरलीधन यांना हरवून त्रिशूर लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यामुळे हा पराभव कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आहे.

पराभवाने राजकीय जीवनातून निवृत्ती

त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून भाजपने केरळमध्ये प्रथमच आपले खाते उघडले आहे. येथे भाजपचे सुरेश गोपी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे  उमेदवार सीपीएमचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74,000 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार मुरलीधरन येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना एकूण 3,28,124 मते मिळाली. या पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराने राजकीय जीवनातून निवृत्ती जाहीर केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.