शिरुर (shirur lok sabha constituency)

 शिरुर (shirur lok sabha constituency)

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक महाराष्ट्रातील राजकीयदृष्या रंगतदार लढत म्हणून शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जाते. मागच्या निवडणुकीत अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते डॉय अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील शिरूरमधून लढण्यास उत्सुक आहेत. तर अमोल कोल्हे पुन्हा एकदा मैदान मारण्यासाठी तयार झाले आहेत. 

शिरूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. 2019 मधील आकडेवारीनुसार शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात एक ते दीड टक्यांनी घट झाली होती. भोसरी विधानसभा आणि हसपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं. 

दरम्यान, आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्याचा फटका अमोल कोल्हे यांना बसू शकतो. राष्ट्रवादीच्या फुटीचा जसा फटका अमोल कोल्हे यांना बसू शकतो, तसाच शिवसेना फुटीचा फटका अढळराव पाटील यांनाही बसू शकतो. त्यामुळेच या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

उमेदवारांची नावे निकाल एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Dr Amol Ramsing Kolhe राष्ट्रवादी विजयी 635830 49.17
Aadhalrao Shivaji Dattatrey शिवसेना हरवले 577347 44.65
Ovhal Rahul वीबीए हरवले 38070 2.94
Kagadi Jamirkhan Afjal बीएसपी हरवले 7247 0.56
Nota नोटा हरवले 6051 0.47
Chhaya Prabhakar Solanke निर्दलीय हरवले 4930 0.38
Bhausaheb Ramchandra Aadagale निर्दलीय हरवले 4397 0.34
Waheeda Shainur Shaikh निर्दलीय हरवले 3837 0.30
Ghadage Balasaheb Jaysing निर्दलीय हरवले 2749 0.21
Shashikant Rajaram Desai निर्दलीय हरवले 1881 0.15
Prof Shrikant Nivrutti Chabukswar Sir बीएमयूपी हरवले 1243 0.10
Ghare Mohan Damodar बीएलजेपी हरवले 997 0.08
Gangadhar Nathu Yadav निर्दलीय हरवले 955 0.07
Vinod Vasant Chandgude निर्दलीय हरवले 902 0.07
Ansari Samshad Anwar निर्दलीय हरवले 828 0.06
Aashtul Vikas Rajaram निर्दलीय हरवले 786 0.06
Somnath Hiraman Mali BARESP हरवले 743 0.06
Sonalitai Thorat निर्दलीय हरवले 677 0.05
Shivajirao Uttamrao Pawar निर्दलीय हरवले 673 0.05
Sanjay Laxman Padwal बीएनएसपी हरवले 630 0.05
Sanjay Baba Bansode बीबीकेडी हरवले 615 0.05
Nitin Muralidhar Kuchekar बीपीएचपी हरवले 607 0.05
Shahid Farukh Shaikh निर्दलीय हरवले 566 0.04
Shaikh Raisa बीएचकेपी हरवले 556 0.04

आता 'या' मतदारसंघात काँग्रेसला उमेदवाराने दिला दगा, भाजपात प्रवेश

LS Election 2024 : काँग्रेससोबत हे देशात काय चाललय? असंच म्हणाव लागेल. त्यांना आपलेच उमेदवार धोका देत आहेत. सूरत पाठोपाठ आणखी एक मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पलटीमुळे भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला.

लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज TV9 मराठीशी बोलले. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं. तुमच्याकडे पैशाच गोडाऊन आहे, असा आरोप झालाय. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे व्यक्त झाले. राजा का बेटा राजा नही बनेगा, या वाक्यामागचा अर्थ सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितला.

घरात बसून, फेसबूक लाइव्ह करून पंतप्रधान होता येतं का ? एकनाथ शिंदे

जे उद्योग राज्यातून गेले ते मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला. आमच्याकडे उद्योगपती येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो, तुम्हा काय सुविधा पाहिजेत ? थेट विचारतो आणि अडचणी सांगा ते सोडवतो, असं त्यांना सांगतो. पण मागचं सरकार त्यांना विचारायचं की आम्हाला काय मिळेल ते आधी सांगा.

माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?

अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. 'पवार साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती. संस्था संपल्या होत्या, कारखाना बंद पडले होते. यावेळेस ही मंडळी आमच्याकडे आली आम्ही विचार केला यांना मदत केली पाहिजे.'

अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?

Madha Election : माढ्यामध्ये स्थानिक राजकीय गणित खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला आपल्याकडे खेचण्याचा पवार गट आणि भाजपाचा प्रयत्न आहे. बारामतीप्रमाणे माढा लोकसभेची जागा प्रतिष्ठेची बनली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काल सोलापुरात तीन सभा झाल्या.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?

भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का?

अजित पवार असोत की मी, आम्ही सगळे घराणेशाहीचाच भाग - सुप्रिया सुळे

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामतीमध्ये कोण बाजी मारतयं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?

Sanjay Raut : "गुजरातच्या व्यापारी, ठेकेदारांना फायदा पोहोचवण हा निर्यातबंदी उठवण्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही. निर्यातबंदी उठवली, ते लहान देश आहेत. अफगाणिस्तान, बहरीन, मॉरिशेस हे छोटे देश आहेत. तिथे आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे. ही धूळफेक आहे"

औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप होताना दिसत आहेत. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच फडणवीस , शिंदेवर टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांची ही टीका भाजप नेत्यांना फारशी रुचलेली नसून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे

मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सेवा,वाढत्या तापमानामुळे सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहेय वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी मतदारानांही त्रास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मतदारांसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून मतदान केंद्रांवर आपला दवाखानाची आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे.

निवडणूक बातम्या 2024
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
लखनऊमध्ये 200 एकर जमीन कोणाची? लवकरच मुख्यमंत्री करणार खुलासा
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
अभिजीत पाटील फडणवीसांच्या भेटीला, शरद पवार गटाची साथ सोडणार का?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
'त्यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही...', राऊत कोणाबद्दल असं बोलले?
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
अश्लील बोलणं, किचनमध्ये छेडछाड माजी पंतप्रधानांच्या नातवावर गंभीर आरोप
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
माझा बालेकिल्ला मजबूत, मी बाहेरसुद्ध सभा घेणार...अमोल कोल्हे
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची किंमत ठेवली नाही; शरद पवारांचा घणाघात
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आम्ही आता तुमची चांगली तुतारी वाजवणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
अजित पवारांचा जुना व्हीडिओ दाखवत भाषणाची सुरुवात; राऊत म्हणाले...
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
हवी तर माझी ब्रेन मॅपिंग करा...मी जबाबदारीपूर्वक सांगतो, साहेबांच्या..
निवडणूक व्हिडिओ
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल