Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकगठ्ठा मराठी-मुस्लिम मतांमुळे मुंबईच्या ‘या’ मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला

Mumbai North East Lok sabha Election Final Result 2024 : मुंबईतील एका मतदारसंघात मराठी-मुस्लिम मतांची बेरीज ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरली. या भागातून एकगठ्ठा मतदान ठाकरे गटाच्या उमेदवाराला झालं.

एकगठ्ठा मराठी-मुस्लिम मतांमुळे मुंबईच्या 'या' मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला
Uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 11:26 AM

मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी वेगळी होती. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. एक गट सत्ताधारी आघाडीत तर दुसरा विरोधी पक्षात होता. उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईत मराठी आणि गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार होती. मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभ मतदारसंघ या लोकसभा क्षेत्रात येतात. 2014 आणि 2019 मध्ये या भागातील मराठी-गुजराती मत महायुतीला मिळाली होती. पण यावेळी मराठी मत महाविकास आघाडीकडे असलेल्या ठाकरे गटाकडे वळली. त्यामुळे ईशान्य मुंबईतील भाजपा उमेदवार मिहिर कोटेचा यांना पराभवाचा झटका बसला. ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दीना पाटील निवडून आले. ते दुसऱ्यांदा खासदार झाले. याआधी 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

मविआचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांचा 29,861 मतांनी पराभव केला. संजय पाटील यांना 4,50,937 मत मिळाली. तेच मिहिर कोटेचा यांना 4,21,076 मत मिळाली. विजयाच अंतर फार मोठ नाहीय. पण सुरुवातीपासून संजय दीना पाटील यांनी आघाडी मिळवली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय दीना पाटील यांचा भाजपाच्या मनोज कोटक यांनी पराभव केला होता. यावेळी कोटक यांच्याऐवजी कोटेचा यांना तिकीट देण्यात आलं होतं. ईशान्य मुंबईत भाजपाचे तीन आमदार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार आहे. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील राऊत आमदार आहेत. भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राम कदम, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे पराग शहा आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत.

मराठी-मुस्लिम मतांची बेरीज पथ्यावर

विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम या तीन विधानसभा मतदारसंघात मराठी मतदारांच प्राबल्य आहे. घाटकोपर पूर्व आणि मुलुंडमध्ये गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे. मानखुर्दमध्ये उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे. मराठी आणि गुजराती मतांच्या विभाजनामुळे संजय पाटील यांचा विजय सुकर झाला. अल्पसंख्यांकांची मतही त्यांच्याकडेच वळली. मराठी बहुल वस्तीतून संजय दीना पाटील यांना जास्त मतदान झाले. कोटेचा यांना गुजरातबहुल मुलुंड आणि घाटकोपर पूर्व मधून मतदान झालं. पण मराठी-मुस्लिम मतांच्या बेरजेमुळे संजय दीना पाटील विजयी झाले.

गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.