AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघर लोकसभा निकाल 2024 : पालघरमध्ये भाजपचा डंका, हेमंत सावरांचा दणदणीत विजय

Palghar Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : पालघर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला पूर्ण झाली असून पालघरमध्ये भाजपचा डंका वाजत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमदेवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी या निवडणूक लढवत होत्या. कामडी यांचा दारूण पराभव करून सावरा यांनी विजय मिळवला. 

पालघर लोकसभा निकाल 2024 : पालघरमध्ये भाजपचा डंका, हेमंत सावरांचा दणदणीत विजय
| Updated on: Jun 04, 2024 | 7:58 PM
Share

पालघर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला पूर्ण झाली असून पालघरमध्ये भाजपचा डंका वाजत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमदेवार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी या निवडणूक लढवत होत्या. कामडी यांचा दारूण पराभव करून सावरा यांनी विजय मिळवला.

पालघर मतदारसंघातून डॉ. हेमंत सावरा यांना 6 लाख 01 हजार 244 मते मिळाली तर भारती कामडी 4 लाख 17 हजार 938 मते मिळाली. तर बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील 2 लाख 54 हजार 517 मते घेतली.

महाराष्ट्रातील एक जिल्हा  असलेला पालघर हा राज्यातील लोकसभेच्या 48 मतदार संघापैकी एक आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन इतर मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यानंतरही बराच वेळ पालघर मतदारसंघात कोणत्याच पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील असेच सर्वांना वाटत होते. पण भाजपच्या पारड्यात ही जागा आली आणि डॉ. हेमंत विष्णू सावरा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी अर्थात ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने येथेही तिरंगी लढत होताना दिसली. आज मतमोजणीनंतर पालघरच्या मतदारांचा कौल कोणाला हे स्पष्ट होईल.

पालघर हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे आणि लोकसभेच्या 48 मतदार संघापैकी एक आहे. 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे दोन तुकडे करून पालघर हा नवा जिल्हा स्थापन झाला. त्यावेळी पालघर हा महाराष्ट्रातील 36 वा नवीन जिल्हा होता. मात्र, याआधी पालघर लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. पालघर लोकसभा मतदार संघात एकूण 20 लाख 89 हजार 750 मतदार आहेत.

2009 मध्ये पहिल्यांदा झाली लोकसभेची निवडणूक

2009 मध्ये येथे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हा बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव येथे खासदार झाले होते. मात्र 2014 साली ही जागा भाजपकडे गेली आणि चिंतामण वनगा खासदार झाले. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चिंतामण वनगा यांना 5,33,201 तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला 2,93,681 मते मिळाली होती.

त्यानंतर 2018 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे राजेंद्र गावित खासदार झाले. यानंतर 2019 मध्ये संपूर्ण देशात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. आता २०२४ च्या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात ? इथे डॉ. हेमंत सावरा विजयी होऊन भाजपाचे कमळ फुलते की भारती कामडी यांच्या विजयनाने शिवसेना उबाठा गटाची मशाल पेटते हे चित्र लौकरच स्पष्ट होईल.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....