AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत उभी फूट, संजय राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांना दिला घरी बसवण्याचा इशारा

काँग्रेसचा दावा असलेल्या दोन जागांवर चर्चा होण्याआधीच ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करुन टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. भिवंडी आणि सांगली या दोन जागांवर काँग्रेस लढण्यावर ठाम असताना संजय राऊत यांनी सांगलीमध्ये जाऊन काँग्रेस नेत्यानाच डिवचले आहे.

सांगलीत उभी फूट, संजय राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांना दिला घरी बसवण्याचा इशारा
sangli loksabha
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 06, 2024 | 9:59 PM
Share

Sangli Loksabha election : ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीत उभी फूट पडताना दिसत आहे. सांगली दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिला. थेट सांगलीत जावून संजय राऊतांनी काँग्रेसला एकाचवेळी दोन इशारेच नाही तर थेट धमकी दिली आहे. सांगलीचा उमेदवार बदलणार नाही. आमची कोंडी केली तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करुन घरी बसवणार असा दमच संजय राऊतांनी काँग्रेसला दिला आहे. राऊतांनी घरी बसवण्याचीच भाषा केली असं नाही तर सांगलीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही नौटंकी बंद करावी असं राऊत म्हणाले आहेत.

सांगतील पोस्टर वॉर

काँग्रेसचा दावा असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस अजूनही ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार आहे. त्यासाठी स्थानिक काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदमांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची भेट घेतली आणि त्यानंतर नागपुरात येवून कदमांनी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथलांचीही भेट घेतली. सांगलीच्या जागेवरुन सोशल मीडियातही पोस्टर वॉर सुरु झालंय. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीत आले होते.

एका पोस्टरमधून राऊतांना डिवचण्यात आलंय. या पोस्टरमध्ये काँग्रेसचा मजबूत हात दाखवलाय. काँग्रेसच्या दंडावर राऊत बोट ठेवत असून, चाचपणी दौरा असं संबोधण्यात आलं आहे.

विश्वजीत कदम लढण्यावर ठाम

काँग्रेसच्या हाताची तपासणी केल्यावर सांगली काँग्रेसचा फुगा कसा फुटला हे यातून दाखवण्यात आलंय आणि काँग्रेसला 2 पराभवांची आठवण करुन देण्यात आलीय. 2014 मध्ये केंद्रीय मंत्री असताना साडे 3 लाख मतांनी पराभव. 2019 मध्ये दीड लाख मतांनी पराभव. ठाकरेंनी सांगलीतून उमेदवार दिला असला तरी काँग्रेस लढणारच असं वारंवार विश्वजित कदम सांगत आहेत. आता तर राऊतांनी विश्वजित कदमांवरच शंका उपस्थित करत, विशाल पाटलांच्या पायलटचं विमान गुजरातकडे जावू नये, असं टोला लगावला आहे.

राऊतांनी सांगलीसह भिवंडीच्या जागेवरुनही काँग्रेसच्या जखमेवर बोट ठेवलं आहे. भिवंडीत काँग्रेस नाही तर शरद पवार गटच जिंकेल हे आम्हीच सांगितल्याचं राऊत म्हणाले आहेत. भिवंडीवरही काँग्रेसचा दावा असताना, शरद पवार गटानं बाळ्या मामा म्हात्रेंची उमेदवारी जाहीर केली.

स्वत: उद्धव ठाकरे यांनीच चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं माघार घेवून बॅकफूटवर येण्याच्या स्थितीत ठाकरे गट नाही. मात्र काँग्रेसही ठाम असल्यानं सांगलीत, महाविकास आघाडीत उभी फूट पडताना दिसत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा