जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, मोहीत कंबोज यांचा राऊतांना टोला

| Updated on: Mar 10, 2022 | 5:05 PM

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पियानो वाजवाल होता. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हार्मोनियम वाजवला होता. भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit kamboj tweet) यांनी हीच आठवण राऊतांना करून दिली आहे.

जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, मोहीत कंबोज यांचा राऊतांना टोला
मोहीत कंबोज यांचे ट्विट
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आज पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल (Elections Result 2022) लागल्यानंतर राज्यातले भाजप नेते शिवसेनेवर तुटून पडले आहेत. त्यात सर्वात जास्त टार्गेटवर संजय राऊत (Sanjay Raut) आहेत. कारण निवडणुकीआधी संजय राऊत रोज भाजपवर तुटून पडायचे. आजच्या दारून पराभवानंतर संजय राऊतांचा सूर काहीसा मवाळला आहे. अशातच भाजप नेत्यांनी मात्र जुने सूड छेडायला सुरू केलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पियानो वाजवाल होता. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हार्मोनियम वाजवला होता. भाजप नेते मोहीत कंबोज (Mohit kamboj tweet) यांनी हीच आठवण राऊतांना करून दिली आहे. मोहीत कंबोज यांनी संजय राऊतांचा एक फोटो ट्विट करत, जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, असे ट्विट राऊतांना उद्देशून केले आहे.

भाजप नेत्यांनी जुने सूर छेडले

मोहीत कंबोज सुरूवातीपासूनच नवाब मलिक आणि संजय राऊतांचा उल्लेख जावेद सलीम असा करत आहेत. त्यातले नवाब मलिक तर आता ईडीच्या कोठडीत आहेत. तर आता संजय राऊतांनी हार्मोनियम पॅक करावे कोठडीत मलिकांना गााणं ऐकवायचं आहे. अशा अर्थाचे ट्विट मोहीत कंबोज यांनी केल्याने हे ट्विट आता चांगलेत व्हायरल होत आहे.

राऊतांचा ट्विट केलेला फोटो

संजय राऊत काय म्हणाले?

राऊत यावेळी म्हणाले, त्यांनी ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळाले आहे. विजय पचवायला शिकलं पाहिजे अजीर्ण झालं की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीनं राज्य करायला शिकलं पाहिजे, असं राऊत म्हणालेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्येही भाजपची आघाडी आहे. भाजपच्या या विजयावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी काँग्रेसचेही कान टोचले आहे. मात्र भाजप नेतेही आता संजय राऊतांच्या टीकेचा चांगलाच वचपा काढताना दिसून येत आहेत.

Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली

tv9 explainer : केजरीवालांचा ‘आप’ राष्ट्रवादीच्या पंगतीत बसणार? राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी कोणते निकष?

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे