AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Sabha Election : 24 वर्षांची सत्ता गेली, प्रतिष्ठाही गेली; मुख्यमंत्री स्वतः निवडणूक हरले…

गेली 24 वर्षे ते मुख्यमंत्री होते. एकदाही निवडणूक हरले नाहीत. परंतु यावेळी भाजप लाटेमुळे त्यांना राज्यातील सत्ता तर गमवावी लागलीच पण आपली जागा वाचवण्यातही अपयश आले. निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Vidhan Sabha Election : 24 वर्षांची सत्ता गेली, प्रतिष्ठाही गेली; मुख्यमंत्री स्वतः निवडणूक हरले...
pm modi and navin patnaikImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 05, 2024 | 6:27 PM
Share

लोकसभा निवडणुकीसोबतच दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. मात्र, देशात सत्ता कुणाची येणार या गदारोळात त्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकाल दुर्लक्षित राहिला होता. यातील एका राज्यात गेली 24 वर्षांची सत्ता भाजपने उलथवली. ओडिशा राज्यात विधानसभेच्या 147 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत 78 जागा मिळवून भाजप सत्तेत आला. तर, गेली 24 वर्ष सत्तेत असलेल्या नवीन पटनाईक यांच्या बीजेडीला 51 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 14 तर अपक्षांनी 4 जागांवर विजय संपादन केला.

ओडिशात 2000 पासून बिजू जनता दलाचे सरकार आहे. तेव्हापासून नवीन पटनायक हे सतत राज्याचे मुख्यमंत्रीपदी कायम होते. 5 मार्च 2000 रोजी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2000 मध्ये भाजप आणि बिजू जनता दल यांची युती होती. या दोन्ही पक्षांनी 147 सदस्यांच्या विधानसभेत 106 जागा जिंकून प्रथमच युतीचे सरकार स्थापन केले आणि काँग्रेसला राज्यातील सत्तेबाहेर काढले. त्या निवडणुकीत बीजेडीने 68 आणि भाजपने 38 जागा जिंकल्या होत्या.

2004 च्या निवडणुकीतही भाजप आणि बीजेडीने एकूण 93 जागा जिंकून पुन्हा सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र, 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची 11 वर्षे जुनी मैत्री तुटली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण नवीन पटनाईक यांनी पक्षाला विजय मिळवून देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

2000, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशी सलग पाच टर्म नवीन पटनाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पण, 2024 च्या निवडणुकीत मात्र त्यांना विजयाचा षटकार मारता आला नाही. त्यांच्या पक्षाला केवळ 51 जागांवर समाधान मानावे लागले. इतकेच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पराभवाचा धक्का बसला. कांताभांजी या विधानसभा मतदारसंघातून त्यांचा भाजपचे लक्ष्मण बाग यांनी पराभव केला. विधानसभेप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही नवीन पटनाईक यांच्या बीजेडीचा दारूण पराभव झाला. राज्यातील लोकसभेच्या 21 जागांपैकी भाजपने 19 आणि बीजेडी आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.