West Bengal Election 2021: राहुल गांधींची अखेर बंगालमध्ये एन्ट्री; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर टीकास्त्र

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 14, 2021 | 4:34 PM

बंगालमधील चार टप्प्यांसाठी मतदान झाल्यावर आणि पाचव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. (Rahul Gandhi slams Pm Narendra Modi And mamata banerjee In His First Rally at Bengal)

West Bengal Election 2021: राहुल गांधींची अखेर बंगालमध्ये एन्ट्री; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर टीकास्त्र
Rahul Gandhi

Follow us on

कोलकाता: बंगालमधील चार टप्प्यांसाठी मतदान झाल्यावर आणि पाचव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. बंगालमधील या पहिल्याच प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. (Rahul Gandhi slams Pm Narendra Modi And mamata banerjee In His First Rally at Bengal)

उत्तर बंगालमधील गोलपोखर येथून राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये आग लावत आहे. तर ममता बॅनर्जी या त्या आगीशी खेळ खेळत आहेत. राज्याचा काहीच विकास झाला नाही. आम्ही भाजपशी कोणतीही तडजोड केलेली नाही. आमची आरएसएससोबत वैचारिक लढाई आहे. त्यांच्या विचारधारेने गांधींजींची हत्या केली आहे. त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढत आहोत. आम्ही जीव देऊ, पण विचारापासून तसूभर मागे हटणार नाही, असं सांगतानाच मोदींनी काँग्रेसमुक्त भारत म्हटलं. पण तृणमूल मुक्त नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजप आणि टीएमसी यांच्यात फिक्सिंग असल्याचे संकेतच दिले आहेत.

खेला होबे… राहुल काय म्हणाले?

रोजगार मिळावा म्हणून लाच दिली जाणारं हे पहिलच राज्य आहे. ममता बॅनर्जी म्हणतात निवडणुकीच्या वेळी खेळ होईल. (खेला होबे) कोणता खेळ? इथले रस्ते कोण बनवणार? खेळच करायचा आहे तर तो रस्त्यावरही करता येईल. येथे महाविद्यालये आणि विद्यापीठे कोण निर्माण करेल? खेळ खेळायचा आहे तर मैदानात खेळता येईल. राज्यात भाजप आणि टीएमसीकडून केवळ ड्रामा सुरू आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

भाजप द्वेष निर्माण करत आहे

तामिळनाडू आणि आसाममधील लोकांना मी विचारलं तुम्हाल काय वाटतं? तेव्हा, ते म्हणाले, आमच्या भाषेवर आणि इतिहासावर आक्रमण होत असल्याचं आम्हाला पहिल्यांदाच वाटत आहे. जी विचारधारा भाजपने बंगालमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. तिच विचारधारा त्यांनी तामिळनाडूत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आसाममध्येही पसरवत आहे. भाजप द्वेष निर्माण करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीच होणार नाही. आग लागली तर इथे लागेल. बंगाल जळेल. बंगालच्या आईभगिनी रडतील. त्यांनी बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये आग लागणार. त्याला कोणीच रोखू शकत नाही. अशी आग लागेल की बंगालमध्ये यापूर्वी कोणीच पाहिली नसेल. मी निवडणुकीचं भाषण करायला आलो नाही. बंगालमध्ये दुफळी निर्माण झाली तर सर्वाधिक नुकसान बंगालची जनतेला होणार. त्याचे बंगालच्या भविष्यावर परिणाम होतील, हे सांगायला मी इथे आलो आहे, असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशात आग लावली, आता काय होतंय?

उत्तर प्रदेशात भाजपने आग लावली. त्यावर निवडणुका जिंकल्या. त्यानंतर काय झाले? आज उत्तर प्रदेशात काय होत आहे? कोरोना आला आहे. रुग्णालये मृतदेहांनी भरून गेले आहे. जिथे पाहावं तिथे लोक कोरोनाने मरत आहेत. सीएमला स्वत: काही कळत नाही. मोदींनी अर्ध्या रात्री नोटबंदी केली. लाखो लोक बरबाद झाले. मोदींना कधी एटीएमच्या किंवा बँकेच्या रांगेत पाहिलं का? लाखो रुपये किंमतीचा सूट परिधान करतात अन् म्हणतात ब्लॅकमनी विरोधात लढाई लढत आहोत, असा चिमटाही त्यांनी काढला.

बंगालचा पहिलाच दौरा

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतरचा राहुल यांचा बंगालमधील हा पहिलाच दौरा आहे. या आधी ते आसाम, केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. या तीन राज्यात सभा आणि रोड शोवर त्यांनी भर दिला होता. बंगालमध्ये उत्तर दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद सारख्या काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची मजबूत पकड आहे. बंगालमध्ये शेवटच्या तीन टप्प्यांसाठी मतदान व्हायचं बाकी आहे. आता राहुल गांधी यांनी बंगालमध्ये एन्ट्री घेतल्याने बंगालच्या निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Rahul Gandhi slams Pm Narendra Modi And mamata banerjee In His First Rally at Bengal)

संबंधित बातम्या:

 ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!

West Bengal Election 2021 : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी

प्रचारबंदीनंतरही ममता बॅनर्जी 2 जाहीर सभा करणार! हे कसं शक्य? वाचा सविस्तर

(Rahul Gandhi slams Pm Narendra Modi And mamata banerjee In His First Rally at Bengal)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI