AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exit Poll 2024: भाजपला 800 ते 900 जागा देतील, संजय राऊत यांनी उडवली एग्झिट पोलची खिल्ली

Sanjay Raut on Exit Poll: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळेतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी होतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील तसेच काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स होणार आहे. देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

Exit Poll 2024: भाजपला 800 ते 900 जागा देतील, संजय राऊत यांनी उडवली एग्झिट पोलची खिल्ली
sanjay raut
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 02, 2024 | 11:23 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एग्झिटपोल शनिवारी संध्याकाळी जाहीर झाले. या एग्झिट पोलनुसार तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एग्झिट पोलची खिल्ली उडवली आहे. चॅनलने मतदान केले नाही किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्याने मतदान केले नाही. एक्झिट पोलचे आकडे ठरवून दिलेले आहेत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत परंतु एका एग्झिट पोलने भारतीय जनता पक्षाला 33 जागा मिळतील, असे दाखवले आहे. यामुळे एग्झिटपोल वाले भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. एग्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या ध्यानवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीत 45 तास ध्यान केले. परंतु ते ध्यानाला बसले असताना कॅमेरे लावले होते. त्यामुळे भाजपला 360-370 जागा मिळणार नाही. त्यांनी केलेल्या ध्यानामुळे किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागले असे म्हणता येईल. ओपनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षांत चुकीचे ठरत आहेत. भाजप देशाचे गृह मंत्रालय आणि यंत्रणा राबवून ते करुन घेत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

इंडिया आघाडीचे सरकार येणार

इंडिया आघाडीचे सरकार देशात येणार आहे. इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. लोकांकडून मिळालेला हा कौल आहे. सध्या मोठे मोठे जे पक्ष आहेत, जे सत्तेवरती आहेत, ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. गेल्या दहा वर्षातील एग्झिट पोल म्हणजे ‘पैसा फेको, तमाशा देखो’ असा आहे. यामुळे आमचा त्यावर विश्वास नाही. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही.

महाराष्ट्रात 35 जागा मिळणार

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 पेक्षा जास्त जागा मिळेतील. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी विजयी होतील. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील तसेच काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स होणार आहे. देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?