AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेत्यांचा प्रताप; मोदी-शाहांच्या मेहनतीवर पाणी, प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत तामिळनाडूतील काँग्रेस आणि द्रमुक पक्षातील घराणेशाहीवर टीका केली होती. | Srinidhi Chidambaram BJP

भाजप नेत्यांचा प्रताप; मोदी-शाहांच्या मेहनतीवर पाणी, प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
| Updated on: Mar 31, 2021 | 11:25 AM
Share

चेन्नई: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत भाजप (BJP) आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ ओढावली आहे. (BJP uses P Chidambaram daughter in law dance clip for campaigning)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत तामिळनाडूतील काँग्रेस आणि द्रमुक पक्षातील घराणेशाहीवर टीका केली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या व्हीडिओमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सून श्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लीप वापरल्याचे समोर आले.ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी भाजपला ट्रोल केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून हा व्हीडिओ तात्काळ डिलीट केला.

काँग्रेसचा भाजपला शालजोडीतला टोला

भाजपने श्रीनिधी चिदंबरम यांची डान्स क्लीप असलेला व्हीडिओ शेअर केल्यानंतर पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. यानंतर काँग्रेसने एक ट्विट करत भाजपला टोला हाणला. एखाद्याची संमती घेणे, ही संकल्पना समजणं तुमच्यासाठी किती अवघड आहे, हे आम्ही समजू शकतो. मात्र, तुम्ही श्रीनिधी चिदंबरम यांचा फोटो आणि क्लीप त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय वापरायला नको होती. तुम्ही जो काही उपद्व्याप केलाय त्यावरुन तुमचा सर्व प्रचार खोटा आणि प्रोपोगंडावर आधारित असल्याचे सिद्ध झाले, असे काँग्रेसने म्हटले आहे.

या क्लीपमध्ये काय आहे?

श्रीनिधी चिदंबरम यांनी 2010 साली जागतिक तामिळ परिषदेच्यावेळी हे नृत्य सादर केले होते. सेमोझी गाण्यावर त्यांनी हे सादरीकरण केले होते. मात्र, भाजपने हा व्हीडिओ कोणाचा आहे, याची खातरजमा न करता तो बिनधास्त आपल्या निवडणूक प्रचारासाठी वापरला.

संबंधित बातम्या:

Tamilnadu Election 2021: अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा; एक कोटी रुपये जप्त

Tamilnadu Election 2021 : पलानीस्वामींवरील अवमानकारक टीकेनंतर ए राजा यांना उपरती, मागितली जाहीर माफी!

Tamilnadu election 2021 : तामिळनाडूचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींपुढे झुकतात तेव्हा वाईट वाटतं – राहुल गांधी

(BJP uses P Chidambaram daughter in law dance clip for campaigning)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.