Assembly Election 2023 | टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच तिकीट

Assembly Election 2023 | क्रिकेट आणि बॉलिवूडच राजकारणाशी सुद्धा कनेक्शन आहे. भारतात अनेक मोठे क्रिकेटस आणि कलाकारांनी बॉलिवूडमधील इनिंग संपल्यानंतर राजकारणात आपलं नशीब आजमवलय. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते गौतम गंभीरपर्यंत अशी अनेक नाव घेता येतील. आता विधानसभा निवडणुकीत टीम इंडियाचा माजी कर्णधार निवडणूक लढवणार आहे.

Assembly Election 2023 | टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच तिकीट
Congress
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 9:06 AM

हैदरादबाद : काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आगामी तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसने माजी खासदार मधु गौड़ यास्खी यांना लाल बहादूर नगर येथून निवडणूक मैदानात उतरवलय. टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलय. काँग्रेसच्या यादीनुसार, पोन्नम प्रभाकर यांना हुसनाबाद, कंडी श्रीनिवास रेड्डी यांना आदिलाबाद आणि तुमला नागेश्वर राव यांना खम्मम येथून के राज गोपाल रेड्डी को मुनुगोडे येथून निवडणूक मैदानात उतरवलय. 30 नोव्हेंबरला होणाऱ्या तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 100 उमेदवारांची घोषणा केलीय. तेलंगणमध्ये एकूण 119 विधानसभा मतदारसंघ आहेत.

तेलंगण संबंधी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर एक दिवसाने नवी दिल्लीच्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात ही घोषणा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सीईसी बैठकीच अध्यक्षपद भूषवलं. सोनिया गांधी, सलमान खुर्शीद यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसने 15 ऑक्टोबरला 55 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली होती. 2018 मध्ये काँग्रेसला किती जागा मिळालेल्या?

तेलंगण निवडणुकीसाठी अधिसूचना 3 नोव्हेंबरला जारी करण्यात येईल. मतदान 30 नोव्हेंबरला होईल आणि निकाल 3 डिसेंबरला जाहीर होईल. काँग्रेसचा तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक प्रचार सुरु आहे. स्वतंत्र तेलंगण राज्याची स्थापन झाल्यापासून के.चंद्रशेखर राव यांचं बीआरएस पक्ष सत्तेवर आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने 47.4 टक्के मतांसह 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्ष 19 जागांसह दुसऱ्या स्थानावर होता.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.