Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवर

Exit Poll Results 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे TV9 Bharatvarsh/Polstrat चे एक्झिट पोल आले आहेत. या पोलनुसार उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपचंच सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवर
पंजाबमध्ये आप, यूपी-गोव्यात भाजप, उत्तराखंडमध्ये त्रिशंकू, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?; वाचा एका क्लिकवरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 7:59 PM

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे (Exit Poll Results 2022) TV9 Bharatvarsh/Polstrat चे एक्झिट पोल आले आहेत. या पोलनुसार उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपचंच (bjp) सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची (aap) सत्ता येण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. मात्र, काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे उत्तराखंडची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तराखंडमध्ये सत्ता येत असल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला असला तरी पंजाबमध्ये मात्र, सत्ता गेल्याचा धक्का सहन करावा लागणार आहे. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग फॅक्टर आणि अकाली दल-बसपा युतीचा काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत आहे. शिवाय काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळेही काँग्रेसची मोठी घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे.

उत्तर प्रदेशात भाजपच

 1. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. TV9 भारतवर्ष-पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात.
 2. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले.
 3. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात सत्ता आणण्याचं अखिलेश यादव यांचं स्वप्नही भंगताना दिसत आहे.

पंजाबमध्ये तेरा झाडू चल गया

 1. TV9 Bharatvarsh/Polstratने पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार आम आदमी पार्टीची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला बहुमत मिळताना दिसत आहे.
 2. दिल्लीनंतर पंजाबमध्येही आपची सत्ता येणार आहे. आपची सत्ता असलेलं पंजाब हे आपसाठी दुसरं राज्य ठरणार आहे. TV9 भारतवर्ष/Pollstart च्या एक्झिट पोलनुसार आपला 56-61 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 24-29 जागा मिळताना दिसत आहेत.
 3. तर अकाली दलाला 22-26 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी अकाली दल आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होताना दिसत आहे. तर भाजप आघाडीला केवळ 1 ते 6 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना किमान 3 जागा मिळण्याची शक्यताही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. या निवडणुकीत आपने 41.2 टक्के, काँग्रेसला 23.2 टक्के, अकाली दलाला 22.5 टक्के, भाजप आघाडीला 7.2 टक्के आणि इतरांना 5.9 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्ये त्रिशंकू

 1. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान झालं होतं. त्यापैकी बहुमतासाठी केवळ 36 जागांची गरज आहे. TV9 Bharatvarsh/Polstrat च्या सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी काँटे की टक्कर दिसत आहे.
 2. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 33-35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 31-33 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे काँग्रेसला बहुमतासाठी अवघ्या एका जागेची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये त्रिशंकू परिस्थिती होताना दिसत आहे.
 3. आम आदमी पार्टीला मात्र शून्य ते तीन जागा मिळताना दिसत आहे. तर इतरांना दोन जागा मिळू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

गोवा भाजपचाच

 1. TV9 Bharatvarsh/Polstrat च्या सर्व्हेनुसार गोव्यातही भाजपचीच सत्ता येताना दिसत आहे.
 2. भाजपला 17 ते 19, काँग्रेसला 11 ते 13, आपला 1 ते 4 आणि इतरांना 1 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 3. गोव्यात उत्तप पर्रिकर फॅक्टर चालताना दिसत नाहीये. तर आपमुळे काँग्रेसला मोठं नुकसान होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

UP Election Exit polls Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज, कुणाला किती जागा?

Goa Election Exit Poll Result 2022: स्पष्ट बहुमत कुणालाच नाही! मग सत्ता कुणाची? छोटे पक्ष ठरवणार

Exit Poll Results 2022 LIVE : उत्तर प्रदेश गोव्यात भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता येण्याची शक्यता

Non Stop LIVE Update
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.