UP Election: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप हिंदुत्वाच्या रथावर स्वार; पक्षाकडून अयोध्या, काशीनंतर मथुरेची तयारी

उत्तर प्रदेश निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याचेच संकेत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वक्तव्य करून दिले आहेत. त्यावरून पुन्हा एक वाद निर्माण झाला आहे.

UP Election: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप हिंदुत्वाच्या रथावर स्वार; पक्षाकडून अयोध्या, काशीनंतर मथुरेची तयारी
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 3:22 PM

लखनौः उत्तर प्रदेश निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्यावर लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याचेच संकेत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वक्तव्य करून दिले आहेत. त्यावरून पुन्हा एक वाद निर्माण झाला आहे. ‘अयोध्या और काशी भव्य मंदिर निर्माण जारी है, और मथुरा की तैयारी है’, हे मौर्य यांनी केलेले वक्तव्य आणि ट्वीट सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही शरसंधान साधत मथुरेत भव्य कृष्ण मंदिर उभारावे की नाही, असा सवाल केला आहे. या वादात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मौर्य यांचे वक्तव्य म्हणजे भाजपला पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यांचा शेवटचा प्रयत्न सुरू असून, हिंदू-मुस्लीम राजकारणापासून जनतेने सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे अजेंडा?

‘अयोध्या और काशी भव्य मंदिर निर्माण जारी है, और मथुरा की तैयारी है’, हे केशव प्रसाद मौर्य यांचे ट्वीट आणि वक्तव्य सध्या चर्चेत आहे. कारण उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा अयोध्या, मथुरा, काशीच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची तयारी केलेली दिसतेय. प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी भाजप असे एखादे प्रकरण हाताशी घेताना दिसते आहे. मग तो धर्मांतरणाचा मुद्दा असो, मॉब लिचिंग. आता एकीकडे राम मंदिर होत आहे. मात्र, दुसरीकडे कृष्ण जन्मभूमीच्या मुदद्यावर भाजप हिंदू व्होट बँक पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरूय.

अचूक वेळी वक्तव्य

केशव मौर्य यांनी आपली राजकीय वाटचालीला विश्व हिंदू परिषदेतून सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी हे विधान योग्य वेळी केले आहे. एकीकडे 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करणार आहेत. या कॉरिडॉरचा शिलान्यास मार्च 2019 मध्ये झाला होता. आता 2021 च्या अखेरीस ते पूर्णत्वास जात आहे. हीच संधी साधून मौर्य उत्तर प्रदेशच्या राजकारणात निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक झालेले दिसत आहेत.

काय आहे वाद?

भाजपच्या अजेंड्यावर अयोध्या, काशी, मथुरा हे आहेच. अयोध्येत बाबरी मशीद आणि श्रीराम जन्मभूमीचा वाद होता. यात सर्वोच्च न्यायालयाने शेवटी मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर आता भाजपकडून मथुराचा मुद्दा तापवला जातोय. मथुरा येथील शाही ईदगाह मशीद ज्या जागेवर उभीय, त्याखाली श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्याचा दावा केला जातोय. मोगल राज्यकर्ता औरंगजेबाने हे मंदिर तोडून येथे मशीद उभारली. याच प्रमाणे काशीचे विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीचा वाद आहे.

मंत्र्यानी मागितली जमीन

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही उत्तर प्रदेशातल्या या वादाबाबत वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, मथुरातील मंदिरासाठी सर्वांनी सहमतीने जमीन दिली पाहिजे. सोबतच त्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर आणि काशीमध्ये बाबा विश्वनाथ मंदिराच्या भव्य पुननिर्माणाची आठवण करून दिली. त्या पुढे म्हणाल्या की, भाविकांसाठी हे सुंदर काम केले जात आहे. म्हणजे मंत्र्यांनाही हाच मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत उचलून धरायचा दिसतो आहे.

‘त्या’ संघटनांची माघार

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यश्री चौधरी यांनी मथुरेत 6 डिसेंबर रोजी मथुरा येथील शाही ईदगार परिसरात मूळ केशव मंदिर आहे, असा दावा केला होता. तसेच येथे अभिषेक करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर इतर हिंदुत्त्ववादी संघटनांनीही येथे अभिषेक, संकल्प यात्रा आणि रामलीला मैदानात सभा अशा कार्यक्रमांची घोषणा केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली. या परिसरात रेड झोनची सुरक्षा तैनात केली. त्यानंतर या संघटनांनी माघार घेतल्याचे दिसते आहे.

इतर बातम्याः

Nashik Corona Update: नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या 467 रुग्णांवर उपचार सुरू; एकाचा मृत्यू, निफाडमध्ये सर्वाधिक 97 रुग्ण

एक पाऊल समतेचे, तेजस्विनी रणात तळपणार; नाशिकमध्ये होणार मुलींसाठी सैनिकी शिक्षण संस्था, पुढील वर्षी प्रवेश

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.