West Bengal Election 2021 Opinion Poll Result: मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींना सर्वाधिक पसंती; मिथुन चक्रवर्ती, सौरव गांगुलीही रेसमध्ये!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'टीव्ही9 भारतवर्ष'ने सर्वात मोठा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. (West Bengal Election 2021 Opinion Poll Result: survey shows Mamata Banerjee as top choice for West Bengal CM)

West Bengal Election 2021 Opinion Poll Result: मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींना सर्वाधिक पसंती; मिथुन चक्रवर्ती, सौरव गांगुलीही रेसमध्ये!
cm mamta banerjee, west bengal

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने सर्वात मोठा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी फॅक्टरच चालताना दिसत आहे. तर दुसऱ्या नंबरवर मोदी फॅक्टर चालताना दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून बंगाली जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच सर्वाधिक पसंती दिली आहे. तर, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनाही मुख्यमंत्री म्हणून बंगाली जनतेने पसंती दिली आहे. (West Bengal Election 2021 Opinion Poll Result: survey shows Mamata Banerjee as top choice for West Bengal CM)

‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने 10 हजार मतदारांचा सर्व्हे केला. विविध प्रश्नांवर त्यांची मते जाणून घेतली. 12 ते 15 मार्च दरम्यान हा पोल घेण्यात आला. त्यातून ममता बॅनर्जी यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी राज्यातील गेमचेंजर मुद्दा कोणता राहील?, नंदीग्राममध्ये कोण जिंकणार? ममता बॅनर्जींवर निवडणुकी दरम्यान झालेला हल्ला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? आदी प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आले. विविध भागात हा सर्व्हे करण्यात आला. त्यातून ममता बॅनर्जी हाच फॅक्टर बंगालमध्ये चालणार असल्याचं दिसून आलं आहे.

हल्ल्याचा फायदा होणार?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला. ममतादीदींना त्याचा फायदा मिळेल का? असा सवाल स्थानिकांना विचारण्यात आलं. तेव्हा 47 टक्के लोकांनी हो म्हणून सांगितलं. तर 41 टक्के लोकांनी नाही म्हणून सांगितलं. तर 11.3 टक्के लोकं काहीच सांगू शकले नाहीत.

कोणता पक्ष सर्वाधिक विकास करेल?

आमच्या टीमने स्थानिकांना कोणता पक्ष पश्चिम बंगालचा विकास करेल असं वाटतं असं विचारलं. तेव्हा 51 टक्के लोकांनी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. यावेळी लोकांनी भाजपला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली. 38.6 टक्के लोकांना भाजप विकास करेल असं वाटतंय. 7.5 टक्के लोकांना डावे तर 1.1 टक्के लोकांना काँग्रेस विकास करतील असं वाटतंय.

दीदीच हव्या

मुख्यमंत्री म्हणून बंगालच्या जनतेने सर्वाधिक पसंती ममता बॅनर्जी यांच्या नावाला दिली. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री व्हाव्यात असं 51.8 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर 24.4 टक्के लोकांनी दिलीप घोष, 5.2 टक्के लोकांनी सुवेंदू अधिकारी, 7.9 टक्के लोकांनी सौरव गांगुली, 4.6 टक्के लोकांनी मिथुन चक्रवर्ती आणि 2.2 टक्के लोकांनी अदीर रंजन चौधरी यांच्या नावाला पसंती दिली आहे.

कोणता फॅक्टर चालणार

टीव्ही9च्या ओपिनियन पोलनुसार बंगालच्या निवडणुकीत सर्वाधिक चालणारा मुद्दा ममता बॅनर्जी याच आहेत. दुसरा मुद्दा मोदी आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर मुस्लिम फॅक्टर आहे. चौथ्या नंबरवर परप्रांतियांचा मुद्दा आणि नंतर भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे असणार असल्याचं दिसून आलं आहे. ममता बॅनर्जी फॅक्टरला 39.7 टक्के, मोदी फॅक्टरला 28.6 टक्के, मुस्लिम फॅक्टर 6.3 टक्के. परप्रांतियांचा फॅक्टर 4.8 टक्के, भ्रष्टाचार फॅक्टर 14.4 टक्के आणि कायदा सुव्यवस्था फॅक्टरला 6.2 टक्के लोकांनी कौल दिला आहे. (West Bengal Election 2021 Opinion Poll Result: survey shows Mamata Banerjee as top choice for West Bengal CM)

 

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी फॅक्टरमध्ये लढाई

 पश्चिम बंगालमध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

West Bengal Election 2021 : यंदा M फॅक्टर कुणाच्या पारड्यात?

(West Bengal Election 2021 Opinion Poll Result: survey shows Mamata Banerjee as top choice for West Bengal CM)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI