नंदीग्रामचं नेमकं गणित काय?, 62 हजार मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात?; वाचा दीदी जिंकणार की दादा?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. (West Bengal Election: It’s Suvendu Adhikari vs Mamata Banerjee in Nandigram)

नंदीग्रामचं नेमकं गणित काय?, 62 हजार मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात?; वाचा दीदी जिंकणार की दादा?
Suvendu Adhikari vs Mamata Banerjee
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 10:57 AM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना तब्बल 50 हजार मतांनी पराभूत करणार असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी नंदीग्राममधील 62 हजार मुस्लिम मतदार हेच कुणाला विजयी करायचं आणि कुणाला पराभूत हे ठरवणार आहेत. त्यामुळे नंदीग्रामचं गणित काय आहे? या मतदारसंघात दीदी जिंकणार की दादा?, नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय ममता बॅनर्जींसाठी आत्मघात तर ठरणार नाही नाही ना? याचा घेतलेला हा आढावा… (West Bengal Election: It’s Suvendu Adhikari vs Mamata Banerjee in Nandigram)

2016ला काय घडलं

2016मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजपला साडे पाच टक्क्याहून कमी मते मिळाले होते. या मतदारसंघात एकूण वैध मते 2 लाख 1 हजार 552 आहेत. भाजपचे उमदेवार बिजन कुमार दास यांना केवळ 10 हजार 713 मते मिळाली होती. तर तृणमूलचे तेव्हाचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममधून महाविजय मिळवला होता. त्यांना 1 लाख 34 हजार 623 मते मिळाली होती. त्यांना एकूण 67.2 टक्के मते मिळाली होती. त्यांनी सीपीआयचे उमेदवार अब्दुल कबीर शेख यांना 81 हजार 230 मतांनी पराभूत केलं होतं. कबीर शेख यांना केवळ 53 हजार 393 मते मिळाले होते. या ठिकाणी भाजप तिसऱ्या नंबरवर फेकली गेली होती. मात्र दोन आणि तिसऱ्या नंबरच्या उमेदवारांमध्येही 40 हजार मतांचा फरक होता.

शुभेंदू अधिकारी भाजपमध्ये

हे आकडे पाहता 19 डिसेंबर 2020 पूर्वी नंदीग्राममध्ये भाजपचा काहीच दबदबा नसल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, 19 डिसेंबर 2020 रोजी शुभेंदू अधिकार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 5.4 टक्के मते मिळाली होती. 2014पासून देशभरात मोदींची लाट असतानाही नंदीग्रामच्या भूमीने मात्र मोदींची लाट थोपवून धरली होती.

सबकुछ शुभेंदू अधिकारी

नंदीग्राममध्ये अधिकारी फॅमिली प्रचंड लोकप्रिय आहे. 2016मध्ये 80 हजाराहू्न अधिक मताधिक्य घेऊन अधिकारी जिंकले, त्यावरूनच या कुटुंबाची लोकप्रियता दिसून येते. 2009 पासून नंदीग्राम हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातं. 2009 आणि 2014मध्ये तामलूकमधून खासदार म्हणून निवडून आले. याच तामलूकमध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघही येतो. 2016मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अधिकारी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या ठिकाणी लोकसभेसाठी त्यांनी त्यांचे बंधू दिव्येंदू अधिकारी यांना मैदानात उतरवले होते. दिव्येंदू या मतदारसंघातील खासदार असून त्यांची आणि ममता यांचंही पटत नसल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर दिव्येंदू यांनी मोदींवर स्तुती सुमनांची उधळण करत राजकीय संदेशही दिला होता.

मतदार कुणाच्या बाजूने?

नंदीग्राममध्ये अधिकारी फॅमिली लोकप्रिय असली तरी स्वत: ममता बॅनर्जी या निवडणूक मैदानात उतरल्याने या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्ष्यवेधी ठरणार आहे. या निवडणुकीत मतदार अधिकारींच्या पारड्यात मतदान टाकणार की दीदींना विजयी करणार हे येत्या 2 मे रोजीच कळणार आहे. नंदीग्राम हे पूर्व मिदनापूरमध्ये येतं. त्यामुळे ममता बॅनर्जी या बाहेरच्या उमेदवार असल्याचं सांगत अधिकारी यांनी त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, ममता बॅनर्जी या राज्याच्या आणि देशाच्या नेत्या आहेत. त्या लोकप्रिय आहेत. त्यामुळे अधिकारी यांच्या या अपप्रचाराला नंदीग्रामचे मतदार किती बळी पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तर राजकीय संन्यास घेणार

ममता दीदींना नंदीग्राममधून 50 हजार मतांनी पराभूत करणार असल्याचा दावा अधिकारी यांनी केला आहे. ममता दीदींना 50 हजाराहून अधिक मतांनी पराभूत नाही केल्यास राजकीय संन्यास घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

फायटर दीदी

कोलकात्यापासून 150 किलोमीटरवर असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचीही फायटर लीडर म्हणून प्रतिमा आहे. नंदीग्राम खऱ्या अर्थाने ममता दीदींसाठी कर्मभूमी राहिली आहे. याच नंदीग्रामच्या आंदोलनातून ममता बॅनर्जी यांनी सीपीएमची 34 वर्षाची सत्ता राज्यातून उलथवून टाकली होती. विशेष म्हणजे 2007-08मध्ये अधिकारी आणि ममता बॅनर्जी सीपीएम विरोधात उभे ठाकले होते. ममता बॅनर्जी या आंदोलनाच्या नेत्या होत्या तर अधिकारी हे संघटक होते. नंदीग्राममध्ये उद्योगांसाठी जमीन संपादित करणअयात येत होती. त्याच्याविरोधात हे आंदोलन होतं. या आंदोलनामुळे ममता बॅनर्जी यांची फायटर नेत्या म्हणून प्रतिमा उजळली होती. आता 13 वर्षानंतर पुन्हा एक वर्तुळ निर्माण झालं आहे. नंदीग्रामसाठी एकमेकांच्यासाथीने लढणारे हे दोन्ही नेते आता नंदीग्रामसाठीच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.

‘एम’ फॅक्टर चालणार?

नंदीग्रामवर तृणमूलचा 2009पासून ताबा आहे. टीएमसीने बंगालमध्ये 2011मध्ये एन्ट्री केली. लेकीन 2009च्या पोटनिवडणुकीत टीएमसीने नंदीग्राममध्ये विजय मिळवला होता. फिरोजा बीवी या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. 2011मध्येही फिरोजा बीवी दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. त्यामुळे नंदीग्राममध्ये मुस्लिम मतेही निर्णायक असल्याचं अधोरेखित झालं होतं.नंदीग्राममध्ये एकूण दोन ब्लॉक आहे. नंदीग्राम-1 आणि नंदीग्राम-2 ही दोन ब्लॉक आहे. पहिल्या ब्लॉकमध्ये 35 टक्के मुस्लिम मतदार आहेत. दुसऱ्या ब्लॉकमध्ये 15 टक्के अल्पसंख्याक आहेत. त्यांची एकूण मते 62 हजार आहेत. तर नंदीग्राममध्ये सव्वा दोन लाख तरुण मतदार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सीपीएम-एमआयएम

त्याशिवाय सीपीएम आणि अब्बास सिद्दिकी यांचा आयएसएफ पक्ष कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार यावरही बरंच काही अवलंबून आहे. सीपीएम आघाडी उमेदवार देणार की भाजपला पराभूत करण्यासाठी ममता बॅनर्जींना पाठिंबा देणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तसेच ओवेसींचा एमआयएम पक्ष कुणाला तिकीट देणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (West Bengal Election: It’s Suvendu Adhikari vs Mamata Banerjee in Nandigram)

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जींच्या पक्षात सहकाऱ्यांचे बंड का?; जुन्या मित्रानेच सांगितली इनसाईड स्टोरी

 भाजपचे 57 उमेदवार ठरले, नंदीग्राममध्ये देशातील सर्वात मोठी लढत

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?

(West Bengal Election: It’s Suvendu Adhikari vs Mamata Banerjee in Nandigram)

Non Stop LIVE Update
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद.
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण....
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण.....
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?.