“वयाच्या 17 व्या वर्षी भावाने इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा..”; ’12th फेल’ विक्रांत मेस्सीने सांगितला प्रसंग

अभिनेता विक्रांत मेस्सीने 'बारवी फेल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांत त्याच्या कुटुंबीयांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. वयाच्या सतराव्या वर्षी भावाने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासा त्याने केला.

वयाच्या 17 व्या वर्षी भावाने इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हा..; '12th फेल' विक्रांत मेस्सीने सांगितला प्रसंग
विक्रांत मेस्सी
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 3:00 PM

मुंबई : 21 फेब्रुवारी 2024 | अभिनेता विक्रांत मेस्सीला विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th फेल’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रेक्षक-समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. मालिकांमध्ये काम करत करत मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलेल्या विक्रांतविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक झाले. याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये विक्रांत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी आणि आतापर्यंतच्या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांतने त्याच्या भावाविषयी सांगितलं. विक्रांतच्या भावाने वयाच्या 17 व्या वर्षी धर्मांतर केलं होतं. त्यावेळी इस्लाम धर्म स्वीकारताना वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा त्याने केला.

तो म्हणाला, “माझ्या भावाचं नाव मोईन असं आहे आणि माझं नाव विक्रांत. त्याचं नाव मोईन का आहे, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर यामागचं कारण म्हणजे त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि माझ्या कुटुंबीयांना त्याला तशी परवानगी दिली आहे. ते त्याला म्हणाले, बेटा जर तुला त्या धर्मात समाधान मिळत असेल तर पुढे जा. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने धर्मांतर केलं आणि ती खूप मोठी गोष्ट होती. माझी आई सिखणी आहे आणि माझे वडील चर्चमध्ये जाणारे ख्रिश्चन आहेत. आठवड्यातून दोन वेळा ते चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नक्की जातात. त्यामुळे कमी वयातच मी धर्म आणि अध्यात्मवरून होणारे बरेच वाद पाहिले आहेत.”

हे सुद्धा वाचा

भावाच्या धर्मांतराविषयी जेव्हा नातेवाईकांना समजलं, तेव्हा त्यांनी विक्रांतच्या वडिलांना विविध प्रश्न विचारले. “तुम्ही तुमच्या मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्याची परवानगी कशी देऊ शकता, असे बरेच सवाल नातेवाईकांनी वडिलांना केले होते. त्यावर ते त्यांना म्हणाले की हा तुमचा प्रश्न नाही. तो माझा मुलगा आहे, तो फक्त मला उत्तर देण्यास बांधिल आहे आणि त्याला जे करायचंय ते करण्याचे अधिकार त्याला आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनात धर्म काय आहे, याविषयी प्रश्न उपस्थित आहे. हे सर्व मानवनिर्मित आहे”, असं विक्रांत म्हणाला.

विक्रांतने ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मालिकामधून तो दर महिन्याला 35 लाख रुपये कमावत होता. मात्र त्या कामाने समाधान मिळत नसल्याने त्याने टीव्ही इंडस्ट्री सोडली होती. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी टीव्हीमधून खूप पैसा कमावला. वयाच्या 24 व्या वर्षी मी माझं पहिलं घर खरेदी केलंय. पण टीव्हीवरील कंटेट पाहून मी तिथे काम करताना खुश नव्हतो. म्हणून चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. माझा हा निर्णय जेव्हा मी घरी सांगितला तेव्हा आईवडिलांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात मी खूप पैसा कमावत होतो. ज्यावेळी मी काम सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हासुद्धा मी महिन्याला 35 लाख रुपये कमावत होतो.”

Non Stop LIVE Update
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल.
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.