AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एक हिट चित्रपट देऊन 27 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुख, दीपिका, प्रभासलाही टाकलं मागे

या अभिनेत्रीला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळाला आहे. तिच्या चित्रपटाने अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये जगभरात 60 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दोन महिन्यांनंतरही तिच्या चित्रपटाचा थिएटर आणि सोशल मीडियावर बोलबाला आहे.

फक्त एक हिट चित्रपट देऊन 27 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुख, दीपिका, प्रभासलाही टाकलं मागे
एका हिट चित्रपटामुळे अभिनेत्रीला मिळाली प्रचंड लोकप्रियताImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 19, 2024 | 11:29 AM
Share

मुंबई : 19 जानेवारी 2024 | रातोरात नशीब पालटणं काय असतं, याचा अनुभव सध्या बॉलिवूडची एक अभिनेत्री घेतेय. कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या भूमिकांसाठी खूप मेहनत घेतात. मात्र या मेहनतीला जेव्हा नशिबाची साथ मिळते, तेव्हा प्रसिद्धी आणि यश मिळवायला फारशी प्रतीक्षा करावी लागत नाही. सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ ठरलेल्या एका अभिनेत्रीसोबत सध्या हेच घडलंय. या अभिनेत्रीचा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक तर झालंच. पण हा चित्रपट जेव्हा ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हा तिची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. या चित्रपटामुळे आता ही अभिनेत्री देशातील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. तिच्या लोकप्रियतेनं शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणलाही मागे टाकलं आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच IMDb ने लोकप्रिय सेलिब्रिटींची आठवड्याभराची यादी जाहीर केली आहे. त्यात ही अभिनेत्री पहिल्या स्थानी आहे.

शाहरुख, दीपिका, प्रभासला टाकलं मागे

IMDb ने जारी केलेल्या यादीनुसार, 16 जानेवारीच्या आठवड्यात अभिनेत्री मेधा शंकर सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचली आहे. मेधा शंकरचा ’12th Fail’ (बारवी फेल) हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. डिस्ने प्लस हॉटस्टारवर या चित्रपटाला दमदार रेटिंग मिळाली आहे. IMDb च्या यादीत मेधानंतर दुसऱ्या स्थानी याच चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सी आहे. या दोघांनी मिळून टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीतील इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by IMDb India (@imdb_in)

‘बारवी फेल’ या चित्रपटानंतर सोशल मीडियावरही मेधा आणि विक्रांत यांची लोकप्रियता वाढली. गेल्या काही दिवसांत या दोघांच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरातील नेटकरी मेधाबद्दल सर्च करत आहेत. मेधाचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स अवघे 16 हजार होते. तोच आकडा आता लाखांमध्ये पोहोचला आहे.

मेधा शंकर ही अभिनेत्री आणि गायिकासुद्धा आहे. तिने दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. 2019 मध्ये तिने ‘बेकम हाऊस’ या ब्रिटीश टीव्ही सीरिजमधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर 2021 मध्ये तिने ‘शादिस्तान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.