2025 हे वर्ष ‘या’ सेलिब्रिटींसाठी ठरले दुर्देवी, काहींच्या नात्यामध्ये गेला तडा
2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र या वर्षामध्ये अनेक सेलिब्रिटींच्या नात्यांमध्ये तडा आलेल्या आहेत तर काहींचे ब्रेकअप झालेलं आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण 2025 हे वर्ष काही सेलिब्रिटींनीसाठी कसे दुर्देव ठरलयं ते जाणून घेऊयात...

काही दिवसातच आपण सर्वजण 2025 या वर्षाला आनंदाने निरोप देऊन 2026 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. मात्र 2025 हे वर्ष बॉलिवूड क्षेत्रात केवळ बॉक्स ऑफिसवरील कामगिरीसाठीच नाही तर मनोरंजन क्षेत्रात काही सेलिब्रिटींच्या तुटलेल्या नात्यांसाठी देखील लक्षात ठेवले जाईल. कारण यावर्षी फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही आणि ओटीटीपर्यंत, अनेक हाय-प्रोफाइल असलेल्या स्टार्स कलाकरांच्या नात्यामध्ये कायमच्या तडा गेल्या आहेत. या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या बातम्या चाहत्यांसोबत शेअर केल्या. चला तर मग आजच्या लेखात आपण 2025 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कोण-कोणत्या कलाकारांचे घटस्फोट आणि ब्रेकअप झालेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
2025 मध्ये सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डिजिटल इन्फ्लुअंसर धनश्री वर्मा यांचे विभक्त होणे. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर 2025 च्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर धनश्रीने पुढे जाण्याचा आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
पलाश मुच्छाळ-स्मृती मानधना
भारतीय स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाने लग्नाच्या काही तास आधी संगीतकार पलाश मुच्छलशी ब्रेकअप केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या नात्याचे भविष्य काय आहे याबद्दल बराच काळ मौन बाळगल्यानंतर, अखेर या जोडप्याने जाहीर केले की त्यांचे लग्न आता होणार नाही आणि ते त्यांच्या आयुष्यात पुढे जात आहेत.
तमन्ना-विजय यांचे ब्रेकअप
2025 मध्ये बॉलिवूडमधील स्टायलिश जोडपे असलेल्या तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्यामध्येही काही कारणांमुळे ब्रेकअप झालं. हे जोडपे इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फॉलो केले जाणारे होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की विजयने तिच्याशी केलेल्या फसवणुकीमुळे ते वेगळे झाले, परंतु दोन्ही बाजूंनी याची पुष्टी केली नाही.
सेलिना जेटली – पीटर हाग
बॉलिवूडची अभिनेत्री सेलिना जेटली हिने अलीकडेच तिचा पती पीटर हागविरोधात मारहाण, मानसिक छळ आणि मालमत्ता हडपल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे. 2011 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत. केला आहे.
मीरा वासुदेवन-विपिन पुतियांकम
दक्षिण भारतीय मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री मीरा वासुदेवन हिने नोव्हेंबर 2025 मध्ये तिचा तिसरा पती सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियाकम यांच्याशी घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली. अभिनेत्रीने घटस्फोटाचे वर्णन भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचे सांगितले.
जी व्ही प्रकाश कुमार-सांधवी
संगीतकार-अभिनेता जी.व्ही. प्रकाश कुमार आणि गायिका सैंधवी यांचे 12 वर्षांचे वैवाहिक जीवन जे शालेय प्रेमसंबंधातून सुरू झाले होते ते 2025 मध्ये विभक्त झाले. 24 मार्च रोजी या जोडप्याने चेन्नई कुटुंब न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
शुभांगी अत्रे-पियुष पुरी
“भाभी जी घर पर हैं” फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे यांना फेब्रुवारी 2025 मध्ये तिचा पती पियुष पुरी यांच्यापासून घटस्फोट मिळाला. दुर्दैवाने घटस्फोटानंतर काही महिन्यांतच तिच्या पतीचे निधन झाले.
संजीव सेठ आणि लता सभरवाल
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेममधील लोकप्रिय टीव्ही जोडपे संजीव सेठ आणि लता सभरवाल यांनीही जून 2025 मध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
मुग्धा चाफेकर आणि रविश देसाई
आणखी एक प्रसिद्ध टीव्ही जोडपे, मुग्धा चाफेकर आणि रवीश देसाई यांनी 2025 मध्ये त्यांच्या नऊ वर्षांचे वैवाहिक जीवनात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा घटस्फोट टीव्ही इंडस्ट्री तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता, कारण त्यांना इंडस्ट्रीतील सर्वात शांत आणि ड्रामा-फ्री जोडप्यांपैकी एक मानले जात असे.
