AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

27 वर्षापूर्वीचा ‘छोटा बच्चा’ आता असा दिसतो, अनिल कपूर आणि श्रीदेवीचा ऑन स्क्रीन मुलगा, आता ओळखणे देखील कठीण

नव्वदच्या दशकातील प्रदर्शित झालेल्या 'मासूम' चित्रपटातील छोटा बचा जान के हमसे ना टकराना रे.... असे डान्स करीत नाचणारा मासून कलाकार आता अगदी तरुण झाला असून त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

27 वर्षापूर्वीचा 'छोटा बच्चा' आता असा दिसतो, अनिल कपूर आणि श्रीदेवीचा ऑन स्क्रीन मुलगा, आता ओळखणे देखील कठीण
judaai and masoom child artist now look like thisImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 26, 2024 | 10:28 PM
Share

साल 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या उर्मिला मातोंडकर, अनिल कपूर आणि श्रीदेवी या त्रिकूटाची ब्लॉकबस्टर फिल्म ‘जुदाई’ जर पाहीला असेल तर या चित्रपटातील श्रीदेवी आणि अनिल कपूरचा ऑनस्क्रीन मुलगा बाल कलाकार आपल्याला आठवत असेलच…आता आता हा मुलगा तरुण झाला असून तो ‘छोटा बच्चा’ राहीलेला नाही. या बालकलाकाराचे आताचे रुप पाहून तुम्हाला धक्का बसेल. आता या बालकलाकाराचे देखणं रुप पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा मुलगा आता चित्रपटात आपले नशीब आजमावित आहे. त्याचे दोन तीन चित्रपट देखील केले आहेत.  तर पाहूया कोण आहे हा कलाकार ..?

येथे पाहा इंस्टाग्राम अकाऊंट –

View this post on Instagram

A post shared by Omkar Kapoor (@omkarkapoor)

अनिल कपूर आणि श्रीदेवी अभिनित चित्रपट ‘जुदाई’ मध्ये त्यांच्या मुलाचे काम बालकलाकार ओमकार कपूर याने साकारले होते. आता ओमकार कपूर 37 वर्षांचा झाला आहे. आणि खूपच हॅंडसम आणि स्टायलिश दिसत आहेत. सोशल मिडीयावर ओमकार कपूर नेहमीच सक्रीय असून आपले फोटो शेअर करीत असतात. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही कूल लूक असलेले फोटो शेअर केले आहेत.  ओमकार कपूर याचे इंस्टाग्रामवर 72 हजार फॉलोअर आहेत.

आता इंस्टाग्राम खाते पाहा –

View this post on Instagram

A post shared by Omkar Kapoor (@omkarkapoor)

जुदाई ते मासूमचा छोटा बच्चा !

ओमकार कपूर याचा जन्म 31 ऑक्टोबर 1986 रोजी झाला. 1996 मध्ये रिलीज झालेल्या ‘मासूम’ या चित्रपटात त्याचा अभिनय नावाजला गेला. त्यात त्याचे छोटा बच्चा समजके हमको ना टकराना रे…हे गाणे खूपच गाजले होते. यानंतर ओमकार कपूर याने मागे वळून पाहीलेच नाही. जुदाई, सलमान खानचा ‘जुडवा’ चित्रपट, गोविंदाचा ‘हिरो नं.1’ आणि आमिर खानच्या मेला चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. वयात आल्यानंतर देखील ओमकारने अनेक चित्रपटात काम केले, प्यार का पंचनामा, झूटा कही का, फोरबिडन लव्ह सारख्या चित्रपटात काम केले आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.