एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक, आजही मनाला स्पर्श करून जातं गीत

किशोर कुमार यांना एक गाणं रेकॉर्ड करायचे होते पण ते हवे तसे होत नव्हते त्यावेळी, किशोर कुमार यांनी एक अनोखी युक्ती वापरली होती. 54 वर्षांनंतरही हे गाणे ब्लॉकबस्टर आहे.

एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक, आजही मनाला स्पर्श करून जातं गीत
kishor kumar songs
| Updated on: Jun 30, 2026 | 1:21 PM

किशोर कुमार हे भारतीय संगीत विश्वाचे कोहिनूर होते. ज्यांची प्रतिभा कधीही फिकी पडणार नाही. ते सुमधुर गीतांचे बादशाह होते, ज्यांनी गाण्यांमध्ये योडलिंगची ओळख करुन दिली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. त्यांनी हजारो सुपरहिट गाणी दिली आणि आपल्या जादुई आवाजाने अनेक कलाकरांना सुपरस्टार बनवले. किशोर कुमार यांनी गाण्याची आणि रेकॉर्डिंगची शेलीही अद्वितीय होती, त्यांचा विश्वास होता की गाणी केवळ गायली जात नाहीत, तर ती जगली जातात, म्हणूनच ते कधीकधी रिकामा चहाचा कप हातात घेऊन, तर कधी नाकाजवळ आगपेटी घरुन गाणे गायचे.

1972 साली बासू चॅटर्जी ‘पिया का घर’ नावाचा चित्रपट बनवत होते. या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते आणि गीत आनंद बक्षी यांनी लिहिले होते. या चित्रपटात किशोर कुमार दोन गाणी गाणार होते, “ये जीवन है, इस जीवन का,” आणि “बॉम्बे शहर की चल तुझको सैर करा दूं.” किशोर कुमार यांनी “बॉम्बे शहर की…” हे गाणे सहजपणे गायले आणि रेकॉर्ड केले, पण जेव्हा “ये जीवन है” या गाण्याची वेळ आली, तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. किशोर कुमार यांनी ते गाणे कितीही वेळा आणि कोणत्याही प्रकारे गायले तरी, लक्ष्मीकांत यांना ते आवडले नाही. त्यांना त्या गाण्यातून हवा असलेला भाव मिळत नव्हता म्हणून, परिस्थिती समजून घेण्यासाठी लक्ष्मीकांत-प्यारेलाल पुन्हा किशोर कुमार यांच्यासोबत बसले. किशोर कुमार यांनी त्या गाण्याचा तीन-चार वेळा सराव केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. किशोर कुमार प्रयत्न करत राहिले, पण अयशस्वी ठरले. थकलेले आणि दमलेले किशोर कुमार खाली बसले आणि त्यांनी एक कप चहा मागवला.

लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल किशोरदांसोबत चहा प्यायला बसले आणि मग जादू घडली. किशोर कुमारने आपला उजवा हात उजव्या गालावर ठेवला आणि चहा पिताना हळूच ‘ये जीवन है’ हे गाणे गुणगुणायला सुरुवात केली. ते स्वतःच्याच सुरात हरवून गुणगुणत होते, तेव्हा लक्ष्मीकांत आनंदाने उद्गारले, “गाणं अगदी असंच आहे, अगदी असंच. हीच हवी असलेली शैली आहे.” किशोरदांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले, पण ते क्षणभरही गाणं थांबले नाहीत. मग किशोर कुमारने टेबलावर बसून, एक हात गालावर ठेवून ते गाणे पूर्ण केले आणि तोच चहाचा कप घेऊन थेट रेकॉर्डिंग रूममध्ये गेले. तोपर्यंत चहा संपला असला तरी, गाण्याचा ओघ कायम ठेवण्यासाठी त्यांनी रिकामा कप हातातच ठेवला. ते रेकॉर्डिंग रूममध्ये शिरले. लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांच्यासोबत संपूर्ण संगीत आणि रेकॉर्डिंग टीम अंतिम रेकॉर्डिंगची तयारी करत होती. मग किशोर कुमारने कमाल केली. त्यांनी ठरवल्याप्रमाणेच गाणे गायले आणि ते गाणे उत्कृष्टपणे रेकॉर्ड झाले.

किशोर दा यांनी संपूर्ण गाणे एका टेकमध्ये रेकॉर्ड केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की “ये जीवन है” गाताना त्याने आपली हनुवटी संपूर्ण वेळ दोन्ही हातांवर ठेवली होती जेणेकरुन गाणे आवश्यक असलेल्या नाजूक शैलीत रेकॉर्ड केले जाऊ शकते.

Follow Us