AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला लवकरच आणखी मोठा धक्का? सचिन अहिर नंतर काही आमदार…शिंदेंच्या विधानाने एकच खळबळ!

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प क्षात प्रवेश केला आहे. लवकरच ते विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाकरे गटाला लवकरच आणखी मोठा धक्का? सचिन अहिर नंतर काही आमदार...शिंदेंच्या विधानाने एकच खळबळ!
uddhav thackeray and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 3:18 PM
Share

Sachin Ahir : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प क्षात प्रवेश केला आहे. लवकरच ते विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत. सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तसेच पक्षाच्या आगामी वाटचालीवर सविस्तर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी भविष्यात आणखी काही आमदार पक्षात येणार का? या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या ऑपरेशन टायगरची चर्चा

काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला अवघे काही दिवस झालेले आहेत. त्यानंतर आता ठाकरेंना दुसरा झटका बसला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात मोठं प्रस्थ असणारे सचिन अहिर यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केले आहे. खासदारांना पक्षात आणण्यासाठी शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आले होते. लवकरच आणखी काही आमदारही पक्षात दाखल होतील, असे तेव्हा सांगितले जात होते. या चर्चेनंतर आता अहिर हे शिंदेंच्या पक्षात दाखल झाले आहेत. दरम्यान, आता अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या ऑपरेशन टायगरची चर्चा होत आहे. ठाकरे यांचे साधारण 14 आमदार आणि 40 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात आहे. यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या आणखी आमदार संपर्कात.

पत्रकारंनी तुमच्या संपर्कात आणखी काही आमदार आहेत का? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी सूचक विधान केले. परंतु कोणतीही थेट माहिती दिली नाही. मी तुम्हाला सध्याच सगळं सांगणार नाही. मी छोटे मोठे ऑपरेशन करत असतो. सध्या फक्त सचिन अहिर यांच्याबाबत मी सांगतो आहे. भविष्यातलं नंतर सागू, असं शिंदे म्हणाले आहेत.

माझ्यासमोरची गोष्ट आहे. 2019 साली फडणवीसांनी ठाकरेंना ५० फोन केले. एकही फोन उचलला नाही. एक तर तू राहशील नाही तर मी राहील अशी भाषा त्यांनी वापरली.. देवेद्रजींवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले. आज त्यांना पुतण्यामावशीचं प्रेम आलं आहे. देवेंद्रजी हुशार आहेत. त्यांना कळतं सर्व, अशी टीकाही शिंदे यांनी केली. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप