AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाऊद इब्राहिमच्या घरी पोहोचला होता कपूर घराण्यातील हा अभिनेता; पुढे जे घडलं ते धक्कादायक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना दाऊद इब्राहिमने घरी बोलावून चहा पाजला आणि दिली होती पैशांची ऑफर. कुठे झालेली भेट?

दाऊद इब्राहिमच्या घरी पोहोचला होता कपूर घराण्यातील हा अभिनेता; पुढे जे घडलं ते धक्कादायक
| Updated on: Jun 11, 2026 | 10:47 AM
Share

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र कपूर घराण्यातील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेला एक खुलासा आजही अनेकांना आश्चर्यचकित करतो. ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात कबूल केले आहे की त्यांची कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वेळा भेट झाली होती.

ही घटना 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांपूर्वीची आहे. त्या काळात दाऊद इब्राहिमची प्रतिमा आजच्यासारखी भारताचा शत्रू किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अशी नव्हती. 1988 मध्ये ऋषी कपूर आपल्या मित्र बिट्टू आनंद यांच्यासह गायिका आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन यांच्या कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते.

दुबई विमानतळावर उतरल्यावर एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे येत फोन दिला आणि दाऊद साहेब बोलतील असे सांगितले. फोनवरून दाऊदने चहासाठी निमंत्रण दिले. कलाकार म्हणून विविध लोकांशी भेटणे ही सामान्य बाब असल्याचे वाटल्याने ऋषी कपूर यांनी हे निमंत्रण स्वीकारले.

यानंतर त्यांना आलिशान रोल्स-रॉईस कारमधून एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे स्वतः दाऊद इब्राहिमने त्यांचे स्वागत केले. ऋषी कपूर यांच्या मते, या भेटीत दाऊदने अत्यंत आदराने वागणूक दिली. चहा-बिस्किटांची मेजवानी झाली आणि वातावरण पूर्णपणे मैत्रीपूर्ण होते. दाऊदने ऋषी कपूर यांना भविष्यात कधीही आर्थिक किंवा अन्य मदतीची गरज भासल्यास निःसंकोचपणे सांगण्याची ऑफरही दिली होती.

दुसरी भेट शोरूममध्ये

पहिल्या भेटीनंतर सुमारे वर्षभराने, 1989 मध्ये, ऋषी कपूर आणि दाऊद यांची पुन्हा एकदा अनपेक्षित भेट झाली. त्या वेळी ऋषी कपूर आपल्या पत्नी नीतू सिंग यांच्यासोबत दुबईतील एका बुटांच्या शोरूममध्ये खरेदी करत होते.

याच दरम्यान दाऊद इब्राहिम आपल्या अंगरक्षकांसह तेथे आला. ऋषी कपूर यांना पाहताच त्याने त्यांची ओळख पटवली आणि मोठ्या आपुलकीने संवाद साधला. इतकेच नाही तर शोरूममधून त्यांना हवे ते सामान खरेदी करण्यास सांगितले आणि त्याचे बिल स्वतः भरण्याची तयारी दर्शवली. मात्र ऋषी कपूर यांनी नम्रपणे हा प्रस्ताव नाकारला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा