‘मी मदन मंजिरी’ गाण्यावर तरुणाचा घायाळ करणारा डान्स; थेट प्राजक्ता माळीला टक्कर
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर या तरुणाने सुंदर नृत्य सादर केले आहे. त्याचे नृत्य पाहून नेटकरीही घायळ झाले. डान्समध्ये थेट फुलवंतीला टक्कर दिल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे, लावणीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजकाल तर मुलींपेक्षा मुलांच्याच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. अशाच एका तरुणाचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर या तरुणाने सुंदर नृत्य सादर केले आहे. तरुणाचा डान्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
थेट प्राजक्ता माळीलाच टक्कर
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी तसेच अनेक दिग्गज कलाकारांची मेजवानी असलेला फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे निर्माती म्हणून प्राजक्ताचा हा पहिला चित्रपट आहे. पेशवाई काळातील प्रसिद्ध नर्तिका असणारी फुलवंती आणि पंडित व्यंकटशास्त्री यांच्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तसाच चित्रपटातील सर्व गाण्यांनाही मिळाला. फुलवंती चित्रपटातील सर्वच गाणी आणि प्राजक्ताचे नृत्य, तिच्या अदा सगळंचं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

Prajakta Mali
त्यातल्या त्यात फुलवंतीमधीलअशी मदन मंजिरी हे गाणे आणि त्या गाण्यावरील प्राजक्ताचे नृत्य बरेच चर्चेत आहे. या गाण्यावर प्राजक्ताने अफालतून डान्स केला आहे. तिच्या या गाण्यावर अनेकजण डान्स करताना, रिल्स बनवताना दिसत आहे. पण सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांने ‘अशी मी मदन मंजिरी’ गाण्यावर अप्रतिम डान्स करून थेट प्राजक्ता माळीलाच टक्कर दिली आहे.
नृत्यासोबत सुंदर अदा
व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाने ‘मी मदन मंजिरी’ गाण्यावर केलेले नृत्य अप्रतिम असल्याच्या कमेंट येत आहेतं. तरुणाने गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर अचूकपणे नृत्य केले आहे. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव , अदाकारी अगदी नृत्याला साजेशी आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून, लावणीवर तरुणही इतक्या चांगल्या प्रकारे नृत्य करू शकतात याचं नेटकऱ्यांकडूनही कौतुकच होतं आहे.मुळात म्हणजे या तरुणाने त्याच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करत त्यावर “जेव्हा मुलंही ट्रेड फॉलो करतात” असं कॅप्शनही दिलं आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांकडून कौतुक
तरुणाचा डान्स आणि त्याची अदाकारी पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या कलेचं, त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे. त्याच्या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तसेच अनेकांनी त्याची तुलना थेट प्राजक्ता माळीसोबत केली आहे. एकाने कमेंट केली आहे की, “मला वाटतं तू तिच्यापेक्षा जास्त चांगला डान्स केला आहे”, तर एकाने लिहिले आहे “एकच नंबर डान्स”, तर एका युजरने तरुणाने ‘मी मदन मंजिरी’ या ओळीवर घेतलेल्या ठेक्याचे कौतुक केले आहे.
