‘लॉरेन्स बिश्नोईचा माणूस येतोय मुंबईत’, सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता धमकी, थेट

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून सलमान खान याला या जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामध्येच 14 एप्रिलला सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला, ज्यानंतर सर्वजण हैराण झाले.

'लॉरेन्स बिश्नोईचा माणूस येतोय मुंबईत', सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता धमकी, थेट
salman khan
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 3:42 PM

बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. 14 एप्रिलला पहाटे सलमान खान याच्या मुंबईतील घरा बाहेर गोळीबार देखील करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खान याच्या घराची बाल्कनी होती. हेच नाही तर हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा आपल्या कुटुंबासोबत घरातच उपस्थित होता. ईदच्या दिवशी ज्या बाल्कनीत उभे राहून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा सलमान खान देत होता, त्याच बाल्कनीला टार्गेट करून गोळीबार करण्यात आला.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळाले. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांमध्ये सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पकडले. गुजरातच्या भुजमध्ये हे हल्लेखोर एका मंदिरात लपून बसले होते.

आता या गोळीबार प्रकरणाला काही दिवस उलट नाहीत, तोवर एक फोन मुंबई पोलिसांना आलाय. ज्यानंतर मोठी खळबळ ही बघायला मिळत आहे. मुंबई पोलिस कंट्रोल रूमला हा फोन आला असून जेलमध्ये असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येत असून तो येथे मोठ्या गोष्टी घडवून आणणार असल्याचे त्या फोनमध्ये सांगण्यात आलंय.

हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा नेमका कोणता व्यक्ती मुंबईमध्ये येतोय, याचा देखील शोध घेतला जातोय. गोळीबाराच्या घटनेंतर सलमान खान हा पहिल्यांदाच स्पाॅट झाला. कडक सुरक्षेमध्ये सलमान खान हा विमानतळावर स्पाॅट झाला. दुबईला सलमान खान गेलाय.

यापूर्वीही सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून थेट जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. थेट एका मुलाखतीमध्ये सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे लॉरेन्स बिश्नोई याने म्हटले होते. लॉरेन्स बिश्नोई हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देताना दिसतोय. सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून सलमान खानला सुरक्षा पुरवली जात आहे.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.