मला फक्त बेडवर पुरुष हवा, आयुष्यात नको! 53 वर्षीय सिंगल अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ
एका 54 वर्षांच्या अभिनेत्रीने अद्याप लग्न केलेले नाही. लोक अनेकदा तिला याबद्दल प्रश्न विचारतात. दरम्यान, तिने लग्नाबद्दल असे काही सांगितले आहे की लोकांना धक्का बसला आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असते. तब्बू आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करते. ५४ वर्षांच्या वयातही तब्बू आजही सिंगल आहे आणि आतापर्यंत तिने लग्न केलेले नाही. लोक नेहमीच विचार करतात की ती कधी लग्न करणार? याच दरम्यान, बॉलिवूडची बोल्ड क्वीन तब्बूचे एक वक्तव्य एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) वेगाने व्हायरल होत आहे. लग्नाबाबत तब्बूने असे काही बोलले आहे की, लोक हैराण झाले आहेत.
तब्बूने खरंच लग्नाबाबत असे वक्तव्य दिले का?
एक्स आणि इंस्टाग्रामवर काही पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये तब्बूच्या शॉकिंग वक्तव्याबाबत सांगितले जात आहे. या पोस्ट्सनुसार तब्बूने म्हटले आहे, ‘मला फक्त बेडवर एक पुरुष हवा असतो, मी सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे.’ ही पोस्ट एका मनोरंजन पोर्टलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. आता खरंच तब्बूने असे म्हटले आहे की नाही, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्वीट समोर आला आहे, ज्यात तब्बूच्या टीमने हे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे. शिवाय असा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही ज्यात तब्बू लग्नाबाबत असे बोलत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तब्बूने या मुद्द्यावर मौन बाळगले आहे.
तब्बूने आतापर्यंत लग्न केलेले नाही
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने आतापर्यंत लग्न केलेले नाही. तरीही तिचे नाव अनेक स्टार्ससोबत जोडले गेले आहे. तब्बू सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि नेहमीच आपल्या फॅन्ससोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तब्बूची प्रत्येक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होते. तब्बू शेवटची क्रू या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. तब्बू लवकरच दृश्यम ३ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
(नोट: हे व्हायरल वक्तव्य फेक असल्याचे तब्बूच्या टीमने स्पष्ट केले आहे. हे जुने किंवा बनावट वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहेत, ज्याला विश्वसनीय स्रोत किंवा तब्बूच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पुष्टी मिळालेली नाही.)
