AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रियांका चोप्रा हिच्यासमोरच पती निक जोनस याच्या अंगावर फेकली महिलेने ब्रा, अत्यंत धक्कादायक प्रकार उघड, वाचा काय घडले

प्रियांका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका चोप्रा ही विदेशातच आहे. मात्र, असे असतानाही प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायमच संपर्कात असते. प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे.

Video | प्रियांका चोप्रा हिच्यासमोरच पती निक जोनस याच्या अंगावर फेकली महिलेने ब्रा, अत्यंत धक्कादायक प्रकार उघड, वाचा काय घडले
Priyanka Chopra
| Updated on: Aug 13, 2023 | 7:08 PM
Share

मुंबई : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आली होती. विशेष म्हणजे मुंबई मेरी जान म्हणत काही फोटो हे प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आज जरी प्रियांका चोप्रा ही विदेशात राहत असली तरीही ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच असते. काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमधील (Bollywood) काळे सत्य सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रियांका चोप्रा हिने मोठे आरोप हे बाॅलिवूडवर केले.

इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने स्पष्ट सांगितले की, आपल्याला कशाप्रकारे बाॅलिवूडमध्ये एका कोपऱ्यात ढकलण्याचे काम सुरू होते. प्रियांका चोप्रा हिला चित्रपटांमध्ये काम दिले जात नव्हते. यासर्व गोष्टींना कंटाळूनच आपण थांबण्याचा निर्णय घेतल्याचे देखील प्रियांका चोप्रा हिने सांगितले होते. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

प्रियांका चोप्रा ही कायमच पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनस हा अमेरिकेचा फेमस गायक आहे. नुकताच निक जोनस आणि त्याच्या भावांचे न्यूयॉर्कमधील एका स्टेडियममध्ये कॉन्सर्ट होते.

कॉन्सर्ट वेळी ज्यावेळी निक जोनस हा गाणे म्हणत होता त्यावेळी एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर लोकांना हा प्रकार अजिबात आवडला नसल्याचे दिसत आहे.

कॉन्सर्टमध्ये निक जोनस गाणे म्हणत असताना चक्क एका मुलीने आपली ब्रा काढून निक जोनस याच्या अंगावर फेकली. दोन मिनिटे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना नेमके काय घडले हेच कळाले नाही. या प्रकारानंतर एक मिनिट निक जोनस थांबला आणि लगेचच त्याने आपले गाणे सुरू केले. आता याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टला प्रियांका चोप्रा देखील उपस्थित होती.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, अरे हा काय प्रकार आहे? त्याला त्याचे काम करू द्या. दुसऱ्याने लिहिले की, हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे, एक मुलगी अशाप्रकारे काम कसे करू शकते. भारतामधूनही या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.