आलिया भट्ट हिच्याकडून मोठा खुलासा, म्हणाली, राहाच्या जन्मानंतर मी…
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे आलियाचे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. आलिया भट्ट ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आलियाकडून पहिल्यांदाच एक मोठा खुलासा करण्यात आलाय.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आलियाने मोठा काळ गाजवला आहे. आता लवकरच आलिया भट्ट हिचा जिगरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील आलिया दिसत आहे. प्रमोशनदरम्यान आपल्या खासगी आयुष्याबद्दलही काही खुलासे करताना आलिया दिसत आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.
आलिया आणि रणबीर कपूर यांच्याकडून कायमच राहा हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. राहा हिच्या जन्मानंतर लगेचच आलिया हिने जिगरा चित्रपट साईन केला. अखेर राहाच्या जन्मानंतर लगेचच आपण जिगरा चित्रपट नेमका कोणत्या कारणामुळे साईन केला हेच सांगताना आता आलिया भट्ट ही दिसली आहे.
आलिया भट्ट म्हणाली की, जेंव्हा मी जिगरा हा चित्रपट साईन केला त्यावेळी मी शेरनी मोडमध्ये होते. मी माझ्या सर्वात संरक्षणात्मक मोडमध्ये होते…राहाच्या जन्मानंतर एक वेगळीच ऊर्जा नक्कीच होती. म्हणूनच मी नेहमी नियती, नशीब, आयुष्याला एका विशिष्ट मार्गाने जाण्यात पाहते. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा असल्याचे सांगतानाही आलिया दिसली.
जिगरा चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैना हे मुख्य भूमिकेत आहेत. आलिया ही मोठ्या बहिणीच्या तर वेदांग रैना हा लहान भावाच्या भूमिकेत धमाका करताना दिसणार आहेत. या जोडीला प्रेक्षकांचे कसे प्रेम मिळते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. जिगरा चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. परत एकदा करण जोहरच्या चित्रपटात काम करताना आलिया दिसणार आहे.
दुसरीकडे वेदांग रैना हा कपूर खानदानाचा जावई होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. वेदांग रैना हा खुशी कपूर हिला डेट करतोय. हेच नाही तर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही सांगितले जाते आहे. खुशी कपूर हिने देखील काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र, खुशी कपूर हिच्या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.
