AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: 5 हजार देशील तर काही तरी फायदा; अभिनेता सुशांत शेलारवर मोठा आरोप?

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गोरेगावमधील एक व्यक्ती सुशांत शेलावर आरोप करताना दिसत आहे. टीव्ही ९ मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

Video: 5 हजार देशील तर काही तरी फायदा; अभिनेता सुशांत शेलारवर मोठा आरोप?
Sushant ShelarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 07, 2025 | 1:58 PM
Share

मराठी अभिनेता सुशांत शेलार हा कामयच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा बदललेला लूक पाहून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. पण सुशांतने त्यावर प्रतिक्रिया देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता सुशांत एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. त्याच्यावर एका व्यक्तीने मोठा आरोप केला आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे? व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती सुशांतवर काय आरोप करत आहे जाणून घेऊया…

नेमके आरोप काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बोलताना दिसत आहे की, मला कळत नाही मी आता काय करु? कधीकधी वाटतं जीव द्यावा. EMIचे हफ्ते भरु कुठून मी.. असे जर समाज सेवक असतील तर काय कामाचे हे समाज सेवक. गोरेगावसारख्या ठिकाणी एक उत्तर भारतीय तो माझ्या अंगापर्यंत आला. काय राहिलं मराठी माणसाचं? आपल्याच विभागामध्ये जर असे समाजसेवक असतील तर… आणि बोलतो मी मराठी मी मराठी. अरे कसला मराठी. मी दहा ठिकाणी प्रयत्न केले. वरळीपासून, महालक्ष्मीपासून ते आपल्या इस्ट पर्यंत (गोरेगाव). जर माझ्याच विभागात जर मला उद्योक करुन देणार नसतील आणि शिंदे सरकारचे असे समाजसेवक असतील तर ते काय कामाचे?’

वाचा: मोठी बातमी! अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुंबईत रंगेहात पकडलं

पुढे ती व्यक्ती व्हिडीओमध्ये सुशांत शेलारवर आरोप करत बोलताना दिसते की, मला EMI वैगरे भरायचे असतात. एवढे पैसे कसे देणार. मी तुला 2 हजार रुपये देतो. 5 हजार देशील तर काही तरी फायदा आहे ना. 2 हजार रुपये मी तुला दोता ये. असं बोलून फोन कट केला. रुम तिथेच आहे ना पण. तू मला सांग तुझ्या गल्लीमध्ये मला देतील का रे गाडी लावायला? मला मान्य आहे. पण सुशांत भाऊ मी तसं बोलत नाहीत. मग तुझ्या गल्लीत स्टॉल लावायचे किती पैसे घेतात विचार तू तिकडे किती भाडं घेतात ते? मी अशा दगा फटकांना घाबरत नाही. त्यांच्यामध्ये जर खरोखर हिम्मत असेल तर समोर येऊन वार करावा. एवढं मी चॅलेंज देतो. कारण मी आता माझ्या जिवाला कंटाळलो आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सध्या सोशल मीडियावर सुशांत शेलारवर आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, मराठी सिनेमांमध्ये याला उभं करत नाय मग आता नवीन धंदाअशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला सल्ला देत, काका मनसे वाल्यांकडे जा असे लिहिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.