AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parineeti Raghav | परिणीती – राघवच्या साखरपुड्याला महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची उपस्थिती, VIDEO

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे राघव चड्ढा यांनी नुकताच साखरपुडा केला. या साखरपुड्याला राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीतील कपुरथळा इथल्या निवासस्थानी हा साखरपुडा केला.

Parineeti Raghav | परिणीती - राघवच्या साखरपुड्याला महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची उपस्थिती, VIDEO
Parineeti Chopra and Raghav Chaddha Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 03, 2025 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली : बऱ्याच चर्चांनंतर अखेर अभिनेत्री परिणीती चोप्राने आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढाशी शनिवारी साखरपुडा केला. दिल्लीत पार पडलेल्या या साखरपुड्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री आणि परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा, भाऊ सिद्धार्थ हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यावर परिणीती किंवा राघव यांनी थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. आता शनिवारी परिणीती आणि राघव यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

राघव चड्ढा हे आम आदमी पार्टीचे नेते असल्याने या साखरपुड्याला राजकीय वर्तुळातून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा समावेश होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दिल्लीतल्या कपुरथळा इथल्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

साखरपुड्यानंतर परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राघव यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यासाठी दोघांचा अत्यंत साधा आणि तितकाच आकर्षक अंदाज पहायला मिळाला. परिणीती आणि राघव यांनी साखरपुड्यासाठी मोती रंगाच्या पोशाखाला पसंती दिली. मनीष मल्होत्राने परिणीतीचे कपडे डिझाइन केले होते. तर राघव यांनी परिधान केलेला अचकन हा त्यांच्या काकांनीच डिझाइन केला होता. ‘ज्या प्रत्येक गोष्टीसाठी मी प्रार्थना केली होती.. मी हो म्हणाले’, असं कॅप्शन देत परिणीतीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

पहा व्हिडिओ

राघव आणि परिणीती हे एकमेकांना युकेमध्ये असल्यापासून ओळखतात. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तर राघवने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यानंतर ती ‘इशकजादे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. अर्जुन कपूरसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली. परिणीतीने ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘हसी तो फसी’, ‘दावत ए इश्क’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.