AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजही मी भाड्याच्या घरात..’; आमिर खानच्या अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतील संघर्ष

कमल हासन यांच्या 'चाची 420' या चित्रपटात फातिमाने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. आमिर खानच्या 'दंगल'मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'थार', 'ल्युडो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

'आजही मी भाड्याच्या घरात..'; आमिर खानच्या अभिनेत्रीने सांगितला इंडस्ट्रीतील संघर्ष
Fatima Sana ShaikhImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2023 | 12:47 PM
Share

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करणारा प्रत्येक सेलिब्रिटी हा श्रीमंत असतो असं अनेकांना वाटतं. मात्र प्रत्येक सेलिब्रिटीच्या बाबतीत हे खरंच असतं असं नाही. आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेख हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:च्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करूनही अद्याप भाड्याच्या घरात राहत असल्याचं तिने म्हटलंय. इतकंच नव्हे तर इंडस्ट्रीतील प्रत्येक दिवस हा संघर्षाचा असल्याचं तिने सांगितलं आहे.

फातिमा म्हणाली, “मी अत्यंत निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत ग्राऊंड फ्लोअरवरील 1RK रुममध्ये राहायचे. हा ग्राऊंड फ्लोअर म्हणजे पार्किंग बेसमेंटचं घर बनवण्यात आलं होतं. तिथून मी आज जिथपर्यंत आले, त्याचा मला स्वत:वर अभिमान आहे. मी स्वत:चं घर घेण्यात अजून यशस्वी झाले नाही. मी अजूनही भाड्याच्या घरात राहते. पण हा संघर्ष करताना मला जे टप्पे पार करायचे होते, ते मी पार केले आहेत. ही प्रक्रिया थांबत नाही आणि हा संघर्षही संपत नाही.”

“तुम्ही सतत चांगल्या कामाच्या शोधात असता आणि तुम्ही सतत स्वत:शी भांडत असता. मी पैशांसाठी काम करावं की थांबावं, हा गुंता नेहमीचाच आहे. त्यामुळे तुमच्या गरजांप्रमाणे तुम्हीसुद्धा बदलत जाता. जर मला माझे बिल्स आणि लोन भरायचे असतील तर मला अशा भूमिका स्वीकाराव्या लागतील, जे करायची माझी इच्छा नसेल. एखाद्याला जगण्यासाठी ते काम करावं लागतं. जेव्हा तुम्ही आलिशान जीवन जगता, पुरेसा आर्थिक पाठिंबा असतो, फक्त तेव्हाच तुम्ही अशी कामं निवडू शकता, जे करताना तुम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री असल्याचा आनंद होईल. पण कधी कधी तुमच्याकडे फक्त तेच काम निवडण्याचा पर्याय नसतो”, अशा शब्दांत फातिमाने तिचा संघर्ष सांगितला. फातिमाने असिस्टंट फोटोग्राफर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी काम करताना स्वत:वरील विश्वास गमावल्याचंही तिने सांगितलं.

कमल हासन यांच्या ‘चाची 420’ या चित्रपटात फातिमाने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. आमिर खानच्या ‘दंगल’मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘थार’, ‘ल्युडो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.