कुठून पकडून आणलंय याला? सलमानच्या एकाच अटीवर झालं आहे अर्पिता – आयुष यांचं लग्न

Salman Khan Sister | आयुष काही कमावत नाही माहिती असताना देखील एकाच अटीवर भाईजानने केलं बहिणीचं लग्न... अनेक वर्षांनंतर अखेर सत्य समोर... आयुष शर्मा यानेच केलं आहे मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्पिता आणि आयुष यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

कुठून पकडून आणलंय याला? सलमानच्या एकाच अटीवर झालं आहे अर्पिता - आयुष यांचं लग्न
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 1:33 PM

अभिनेता सलमाल खान कायम त्याच्या कुटुंबियांचा विचार करत असतो आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय देखील घेत असतो. बहीण अर्पिता शर्मा हिच्याबद्दल देखील सलमान खान याने एक मोठा निर्णय घेतला आणि तिचं लग्न आयुष शर्मा याच्यासोबत लावून दिलं. 2014 मध्ये अर्पिता आणि आयुष यांचं मोठ्या थाटात लग्न झालं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आज दोघे आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे… पण अनेकांना एक प्रश्न पडतो, आयुष याने सलमान खान याच्यासोबत अर्पिता हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा कशी व्यक्त केली… याचा खुलासा खुद्द आयुष याने केला आहे.

आयुष याने सांगितल्यानुसार, वयाच्या 23 वर्षी खुद्द आयुष, अर्पिता हिच्यासोबत लग्न पक्क करण्यासाठी आला होता. ‘मी अर्पिता हिच्यासोबत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बिरयानी खात बसलो होतो. तेव्हा सलमान तिकडे आला आणि अचानक माझ्यासमोर उभा राहिला. आमच्यामध्ये हॉलो.. हाय झालं आणि त्यानंतर तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी सलमान याने मला भेटण्यासाठी बोलावलं… मला विचारलं काय करतो म्हणून, काय काम केलं आहे?’

सलमानने मला विचारलं काय फ्यूचर प्लान आहे? तर मी सांगितलं लग्न करायचं आहे… मला वयाच्या 30 व्या वर्षी लग्न करायचं होतं… पण मला अर्पिता हिला गमवायचं देखील नव्हतं… पुढचा प्रश्न होता, किती कमावतो… यावर मी खरं सांगितलं काहीही कमावत नाही… वडिलांच्या पैशांवर जगत आहे… माझा हाच प्रामाणिकपणा सलमान याला आवडला आणि त्याने आमच्या नात्याला मान्यता दिली… कुठून पकडून आणलंय याला? अलं देखील अभिनेता म्हणाला…

हे सुद्धा वाचा

पुढे आयुष म्हणाला, ‘सलमान खान याने लग्नासाठी होकार दिल्यानंतर सलीम खान यांनी देखील होकार दिला… त्यानंतर माझ्या कुटुंबाला देखील सांगितलं… दोन्ही कुटुंबाने होकार दिल्यानंतर आमचं लग्न झालं.’ सध्या सर्वत्र आयुष आणि अर्पिता यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

अर्पिता, सलमान खान याची बहीण असल्यामुळे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अर्पिता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अर्पिता कायम दोन मुलं आणि पतीसोबत फोटो पोस्ट करत असते.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.