AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता त्यांनी विभक्त व्हायला हवं…’, अभिषेक बच्चन याने काढली साखरपुड्याची अंगठी? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, अभिनेत्याने काढली साखरपुड्याची आंगठी? चाहते म्हणाले...; सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा... मोठी अपडेट समोर...

'आता त्यांनी  विभक्त व्हायला हवं...', अभिषेक बच्चन याने काढली साखरपुड्याची अंगठी? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
| Updated on: Dec 02, 2023 | 3:13 PM
Share

मुंबई | 2 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं कपल बॉलिवूडच्या बेस्ट कपल पैकी एक होतं. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा असयाची. एक काळ असा होता, जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत होते. पण गेल्या काही दिवसांपासून सतत अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पूर्वी प्रत्येक ठिकाणी अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमात लेक आराध्या हिच्यासोबत उपस्थित राहायचे. पण आता ऐश्वर्या कायम मुलीसोबत दिसते. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, अभिषेक बच्चन याचे साखरपुड्याची आंगठी काढून फोटोशूट केल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, एका Reddit यूजरने अभिषेक बच्चन याचे काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्या बोटात अंगठी दिसत नसल्याचं समोर येत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक बच्चन याच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘घटस्फोट देऊन आता त्यांनी पुढे जायला हवं..’, ‘फोटोमध्ये अभिषेक याने अंगठी घातलेली नाही नाही तर, तो कायम अंगठी घायालचा…’ याआधी देखील अनेक कारणांमुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली. पण यावर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या हिचा वाढदिवस होता. तेव्हा अभिषेक याने फक्त ऐश्वर्या हिचा एकटीचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर, ऐश्वर्या हिच्या वाढदिवसासाठी बच्चन कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं. अभिनेत्रीने फक्त आई आणि लेक आराध्या हिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये अभिनेत्रीने आराध्या हिला जन्म दिला.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त पती अभिषेक याला फॉलो करते. तर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत