AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan : ‘मी तिचं मत ऐकण्याइतका ..’ लेक आराध्याबद्दल अभिषेक बच्चन हे काय बोलून गेला ?

Abhishek Bachchan talks about Aaradhya Bachchan : अभिषेक बच्चन हा लवकरच 'राजा शिवाजी' या चित्रपटात दिसणार आहे. येत्या 1 मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

Abhishek Bachchan : 'मी तिचं मत ऐकण्याइतका ..' लेक आराध्याबद्दल अभिषेक बच्चन हे काय बोलून गेला ?
अभिषेक बच्चन
| Updated on: Apr 21, 2026 | 10:57 AM
Share

‘गुरु’, ‘रन’, ‘युवा’, ‘दिल्ली 6’ आणि ‘धूम’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवूनही अभिषेक बच्चनला अंडररेटेड अभिनेता म्हटलं जातं. त्याने एकाहून एक सरस अशा चित्रपटांमध्ये काम केलंय, पण त्याची तुलना नेहमीच त्याच्या वडिलांशी, अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते. अभिषेकने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तो अनेक विषांयवर मोकळेपणाने बोलला. कोणत्याही कलाकारासाठी लोकांच्या कौतुकाइतंकच घरच्यांची प्रतिक्रिया, त्यांच्या कमेंट्स, त्यांनी केलेलं कौतुक ऐकणं महत्वाचं असतं. मा्त्र असं असलं तरी अभिषेक मात्र त्याच्या घरातील एक सदस्याची प्रतिक्रिया घेमं, मतं विचारणं टाळतो. ती व्यक्ती म्हणजे त्याची लेक. खुद्द भिषेकनचे याचा खुलासा केला. आपल्या चित्रपटांबद्दल तू तुझी मुलगी, आराध्या हिच्याशी चर्चा करतोस का, तिचं मत विचारतोस का ? असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. त्यावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे.

तिचं मत काय हे ऐकण्याइतका मी खंबीर नाही

एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने यावर स्पष्टपणे मत मांडलं ” “मी तिला कधीच विचारणार नाही.” असं तो म्हणाला, रपण त्याने लगेचच त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. ” मी तो ( तिला प्रतिक्रिया) विचार माझ्या मनातच ठेवेन. कारण एकदा तिने उत्तर दिलं की —तिला माझं काम आवडलं किंवा नाही आवडलं —मग माझ्या कामाची पद्धत बदलेल. म्हणून मी मुद्दाम तिला (आराध्याला) विचारत नाही, कारण कदाचित तिचं मत ऐकण्याइतका खंबीर मी नाही. तिला काय आवडेल किंवा नाही, याचा विचार करणंच मला अधिक पसंत आहे” असं अभिषकने नमूद केलं.

आराध्याच्या मताने प्रभावित व्हायचं नाहीये

आजची मुलं अधिक मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे स्वतःचं मत व्यक्त करतात, असं अभिषेक बच्चन पुढे म्हणाला. “आजची मुले खूप कॉन्फिडंट असतात, त्यांना नक्की काय हवं आहे हे त्यांना माहीत असते. ते स्वतःला स्पष्टपणे व्यक्तही करतात. कधीकधी आमच्या पिढीतील लोकांना त्यांचे ऐकून घेणे अवघड जातं.” असं त्याने पुढे नमूद केलं.

“कारण ते अगदी सरळ आणि थेट, स्पष्ट बोलतात. आणि प्रत्येक वेळेस ते ऐकू घेणं हे सोपं नसतं. एक पालक म्हणून, मला इतरांच्या मतांनी प्रभावित न होता, ज्यावर माझा विश्वास आहे तेच करायचं आहे. कदाचित कालांतराने हा विचार बदलेल” असंही अभिषेकने सांगितलं.

आराध्याचं मत कधी घेणार विचारात ?

पुढे अभिषेकने हेही मान्य केलं की एक वेळ अशी येईल की तो त्याच्या मुलीला तिचं मत विचारेल.  तो म्हणाला, ” देवाची इच्छा असेल तर, जेव्हा ती स्वतः आई होईल, तेव्हा मी तिला कदाचित विचारेन. पण सध्या, मला तिच्या विचारांनी प्रभावित व्हायचं नाही. मला नाही वाटत की मी तिला कधी (हा प्रश्न) विचारने” असं त्याने सांगितलं. “मला खात्री आहे की ती कधीतरी तिचं मत देईल, पण मी अजून तिला विचारलेलं नाही” असंही तो हसून पुढे म्हणाला.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले