AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षाने मोठ्या असलेल्या मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले, लवकरच लग्न आणि…

अभिनेते अनिल कपूर हे बिग बॉस ओटीटी 3 मुळे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल कपूर बिग बॉस ओटीटीला होस्ट करताना दिसत आहेत. आता नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांनी काही मोठे खुलासे केले आहेत. हेच नाही तर अर्जुन कपूरच्या लग्नाबद्दलही भाष्य केले आहे.

12 वर्षाने मोठ्या असलेल्या मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले, लवकरच लग्न आणि...
Anil Kapoor and Arjun Kapoor
| Updated on: Jun 24, 2024 | 11:39 AM
Share

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे कायमच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. अर्जुन कपूर आणि मलायका सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना देखील दिसतात. अर्जुन कपूर आणि मलायका काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई लवकरच मलायका अरोरा होईल, त्यानंतर अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा संताप व्यक्त केला होता.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कधी लग्न करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या लग्नावर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीतरी भाष्य केले आहे. अनिल कपूर हे सध्या बिग बॉस ओटीटी 2 ला होस्ट करताना दिसत आहेत. कालच बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर झालाय.

अनिल कपूर यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनिल कपूर हे आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसले. हेच नाही तर अनिल कपूर म्हणाले की, बोनी कपूर हे कोणत्याही कार्यक्रमाला उशीरा येणारे सदस्य आमच्या घरातील आहेत. यावेळी अनिल कपूर यांना मोठा प्रश्न विचारण्यात आला. विशेष म्हणजे त्याचेही उत्तर अनिल कपूर यांनी दिले आहे.

अनिल कपूर यांना विचारण्यात आले की, कपूर खानदानामध्ये आता कोणाचे लग्न सर्वात अगोदर होणार आहे. यावर अनिल कपूर हे म्हणाले की, अर्जुन कपूर याचे लग्न अगोदर होईल. म्हणजेच आता लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे लग्न होईल. अनिल कपूर यांनी लग्नाबद्दल मोठी हिंटच देऊन टाकलीये.

मलायका अरोरा ही 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वर्षाचा आहे. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचा अंतर आहे. शिवाय मलायका अरोरा हिला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव अरहान खान आहे. अर्जुन कपूर याचे लग्न सर्वात अगोदर होईल, असे अनिल कपूर यांनी म्हटले. मात्र, मलायका अरोरा की, इतर कोणासोबत अर्जुन लग्न करणार यावर अनिल कपूर यांनी भाष्य केले नाहीये.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना