Video : अभिनेते आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या पत्नीचा अपघात, बाईकस्वाराने दिली धडक, व्हिडीओ शेअर करत म्हणाले..
अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे काल रात्री उशिरा गुवाहाटी येथे झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत प्रकृतीची माहिती दिली. काय म्हणाले ते ?

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री गुवाहाटी येथील जू रोड येथे झालेल्या आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ यांचा अपघातझाला, त्यामध्ये दोघे जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे एका रेस्टॉरंटबाहेर निघत होते, तेव्हाच रास्ता क्रॉस करताना त्यांचा हाँ अपघात झाला. त्यामुळे मोठी खळबळ माजली. मात्र या अपघातानंतर खुद्द आशिष विद्यार्थी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील त्यांच्या अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत आपल्या तब्येतीबाबात माहिती दिली. आपण व आपली पत्नी रुपाली दोघेही ठीक आहोत, अशी माहिती त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. आम्ही दोघेही सुरक्षित आहोत आणि रिक्हरी होत आहे, असं त्यांनी सांगितल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कसा झाला अपघात ?
आशिष विद्यार्थी आणि रूपाली बरुआ हे काल रात्री जेवणानंतर पायी रस्ता ओलांडत असताना ह अपघात घडली. एका भरधाव मोटारसायकलने त्यांना धडक दिली. मात्र हा अपघात होताच तेथील स्थानिक लोकांनी तत्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि या घटनेची प्रशासनाला तातडीने माहितीदेील दिली. त्यानंतर आपत्कालीन सेवांनी तातडीने मदत केली आणि आशिष विद्यार्थी व त्यांच्या पत्नीला, लगेचच वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. एवढंच नव्हे तर त्यांना धडक देणाऱ्या मोटारसायकलस्वारालाही उपचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात (GMCH) दाखल करण्यात आले आहे.
आशिष विद्यार्थी यांनी शेअर केली हेल्थ अपडेट
या अपघातानंतर आपली व पत्नीची ख्यालीखुशाली सांगत आशिष विद्यार्थी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. घाबरण्याचे काहीही कारण नाही असं ते म्हणाले. रूपाली यांना केवळ खबरदारी म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. रुपाली यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या हळूहळू बऱ्या होत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि सगळं लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वासही त्यांनी चाहत्यांशी बोलतना व्यक्त केला.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये शिष विद्यार्थी यांनी त्यांच्या तब्येतीबाबतही अपडेट्स दिले. मला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. मी आधाराशिवाय चालू शकतोय, नीट बोलू शकतोय आणि व्यवस्थित उभाही राहतोय असं त्यांनी सांगितलं. या कठीण काळात पाठिशी उभं राहिल्याबद्दल आणि काळजी दर्शवल्याबद्दल त्यांनी सर्व हितचिंतक आणि चाहत्यांचे मनापासून आभारही मानले.
आशिष विद्यार्थी यांनी केवळ त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीबद्दलच नाही तर ज्या मोटारसायकलस्वाराने त्यांना धडक दिली त्याच्याबद्दलही माहिती दिली. मी पोलिसांशी बोललो आहे आणि तो बाईकस्वार आता शुद्धीवर आला आहे, असं त्यांनी नमूद केलं. या अपघातानंतर लगेच मदतीसाठी पोहोचलेल्या स्थानिकांचे, आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांचे आणि रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आशिष विद्यार्थी यांनी कौतुक केलं आणि त्यांचे आभारही मानले.
