अभिनेता इरफान खानचं लवकरच पुनरागमन

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान खान हा लवकरच आपल्याला पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला. सध्या मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्येत ठीक …

अभिनेता इरफान खानचं लवकरच पुनरागमन

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इरफान खान हा लवकरच आपल्याला पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला. सध्या मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तब्येत ठीक होताच इरफान पुन्हा कामावर परतणार आहे.

इरफान खान 22 फेब्रुवारीपासून ‘हिंदी मीडियम’ या सिनेमाच्या सिक्वलच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. कॉस्ट्युम डिझायनर्सने इरफानच्या वेशभूषेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमात इरफानसोबत कुठली अभिनेत्री असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, या सिनेमाच्या निर्मात्यांनी आभिनेत्री करिना कपूर खानला या सिनेमात घेण्याचा विचार केला आहे. त्यासाठी करिनाला सिनेमाची स्क्रिप्टही पाठवण्यात आली आहे. मात्र, करिनाने अजून यावर काहीही उत्तर दिलेले नाही.

‘हिंदी मीडियम’ या सिनेमाचा पहिला भाग हा 2017 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. साकेत चौधरीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमात इरफान खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. मात्र, भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असल्याने सबा या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार नाही. या सिनेमात अभिनेता दीपक डोबरियाल यानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *