AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत ऐकून बसेल धक्का

अभिनेता रणवीर सिंह हा 'धुरंधर' चित्रपटाच्या यशाने चर्चेत असताना त्याने एक नवी कोरी फेरारी कार विकत घेतल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. या कारची एक झलक मुंबईच्या रस्त्यावर नुकतीच लोकांना पाहायला मिळाली आहे.

अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत ऐकून बसेल धक्का
Ranveer Singh bought a car (1)
| Updated on: Jun 15, 2026 | 6:10 PM
Share

धुरंदर चित्रपटाच्या कमाईने सारे विक्रम मोडले असतानाच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. धुरंधर चित्रपटाच्या दोन्ही भागांनी मिळून जगभरात 3,200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. धुरंदरच्या सक्सेसला सरावलेल्या रणवीर सिंह याचा ‘डॉन 3’ चित्रपटाच्या करारभंग वादाने पुन्हा तो चर्चेत आला आहे. या सर्व गोंधळात त्याच्या घरी लहानग्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे.

आता दुसरा पाहुणा म्हणजे त्याचे दुसरे अपत्य नव्हे तर नवीन आलिशान कार आहे. रणवीर याने त्याचे कार कलेक्शनमध्ये नवीन सुपर एक्सपेन्सिव्ह कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

रणवीर सिंह याने खरेदी केली कार

रणवीर सिंह हा अलिकडे मुंबईतील रस्त्यावर त्याची आलिशान चमचमती कार चालवताना दिसला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. अभिनेत्याने नवीन ब्लॅक फरारी खरेदी केली असून तिची किंमत देखील प्रचंड आहे.

फेरारीची किंमत किती ?

अभिनेता रणवीर सिंह जी कार फेरारी चालवत होता, त्याचे मॉडेल Ferrari 296 GTB आहे. या लक्झरी स्पोर्ट्स कारची किंमत 6.36 कोटी रुपये आहे. त्याने त्याच्या लक्झरी कारच्या संग्रहात आणखी एका कारचा समावेश केला आहे.

डॉन 3 चा वाद नेमका काय ?

रणवीर डॉन 3 चित्रपटाच्या वादाने प्रचंड चर्चेत आहे. धुरंधरच्या यशानंतर अभिनेता रणवीर यांनी अचानक फरहान अख्तर यांच्या चित्रपटातून माघार घेतली आहे. बातमीनुसार या चित्रपटाचे शुटींग तीन आठवड्याने सुरु होणार असताना त्याने हा चित्रपट अचानक सोडल्याने तो वादात सापडला आहे.

मेकर्सच्या मते अभिनेता रणवीर सिंह याने अचानक हा चित्रपट सोडल्याने 45 कोटींचा फटका बसला आहे. रणवीर याला हे नुकसान भरावे लागणार आहे. फरहान याने फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया एम्प्लॉयज (FWICE) कडे याची तक्रार केली होती. हा वाद अजूनही सुटलेला नाही.

येथे पाहा पोस्ट –

रणवीर सिंह याचा आगामी चित्रपट कोणता ?

धुरंधर 2 च्या सक्सेसनंतर रणवीर सिंह त्याचा आगामी चित्रपट ‘प्रलय’च्या तयारीला लागला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय मेहता करीत असून हा झॉम्बी थ्रिलर सिनेमा आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा